Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ठरलं! बारामतीत काका-पुतण्याची लढाई रंगणार! अजित पवार गटाचे पहिले 20 उमेदवार जवळपास निश्चित वाचा यादी

NCPs first list of 20 candidates for assembly election :राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने पहिल्या 20 उमेदवारांची यादी जवळपास निश्चित केली आहे. यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत ही यादी तयार करण्यात आली. याबाबत अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु वर्तवलेल्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने पहिल्या 20 उमेदवारांची यादी निश्चित केली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत महत्त्वाच्या लढतींना तोंड देण्याची तयारी सुरू आहे. बारामतीत काका अजित पवार आणि पुतण्या युगेंद्र पवार यांच्यातील लढत हे राज्यभरात चर्चेचे विषय ठरणार आहे.

NCP s first list of 20 candidates for assembly election

20 निवडलेले उमेदवार

या यादीत विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. अजित पवार हे बारामतीमधून, हसन मुश्रीफ हे कागलमधून आणि छगन भुजबळ हे येवला मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय दिलीप वळसे पाटील आंबेगावमधून, घनंजय मुंडे परळीमधून, आदिती तटकरे रायगडमधून तर संग्राम जगताप अहमदनगरमधून निवडणूक रिंगणात असतील.

बारामतीत काका-पुतण्याची लढत

बारामती मतदारसंघात अजित पवार हे महायुतीचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार निवडणूक लढवणार आहेत. युगेंद्र यांनी अलीकडेच त्यांच्या इच्छेबद्दल स्पष्ट भूमिका घेतली आहे. शरद पवार व पक्षाच्या वरिष्ठांनी संधी दिली तर ते काका अजित पवारांविरुद्ध निवडणूक लढवतील, अशी त्यांची घोषणा आहे. त्यांनी तालुक्यात स्वाभिमान यात्रा सुरू करून आपल्या उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

महत्त्वपूर्ण विधानसभा मतदारसंघ

राज्यातील इतर प्रमुख मतदारसंघांमध्ये दिंडोरीतून नरहरी झिरवळ, इंदापूरमधून दत्ता भरणे, खेडमधून दिलीप मोहिते-पाटील, आणि मावळमधून सुनील शेळके यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. याशिवाय, वडगाव शेरी मतदारसंघात सुनील टिंगरे यांनाही उमेदवारी मिळू शकते. प्रत्येक मतदारसंघात महायुतीने आपले स्थान बळकट करण्याची तयारी सुरू केली आहे.

जागावाटपावर चर्चा सुरू

अजित पवार गटाने महायुतीतील इतर घटक पक्षांसोबत जागावाटपावर चर्चा सुरू केली आहे. 20 उमेदवार निश्चित झाले असले तरी, इतर मतदारसंघांमध्ये चर्चा अद्याप सुरू आहे. महायुतीमध्ये सत्ताधारी भाजप व शिवसेनेसह इतर छोटे घटक पक्षही आहेत, त्यामुळे प्रत्येक पक्षाला योग्य प्रमाणात जागा मिळवण्यासाठी जागावाटपावर तोलामोलाची चर्चा चालू आहे.

अजित पवारांचे बारामतीतून...

अजित पवार यांनी बारामतीत निवडणूक लढवावी अशी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यांच्या समर्थनार्थ 1 लाख 11 हजार 707 विनंती पत्रे आलेली आहेत. त्यामुळे मतदारांच्या आग्रहाखातर अजित पवार हेच बारामतीमधून निवडणूक लढवतील हे स्पष्ट झाले आहे. यामुळे बारामतीत काका-पुतण्यात राजकीय संघर्ष होणार आहे, जो राज्याच्या राजकारणात एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

निवडणुकीसाठी तयार असलेल्या उमेदवारांची यादी
(NCP's first list of 20 candidates for assembly election)

1. बारामती : अजित पवार
2. कागल : हसन मुश्रीफ
3. येवला : छगन भुजबळ
4. आंबेगाव : दिलीप वळसे-पाटील
5. परळी : घनंजय मुंडे
6. दिंडोरी : नरहरी झिरवळ
7. रायगड : आदिती तटकरे
8. अहमदनगर : संग्राम जगताप
9. खेड : दिलीप मोहिते-पाटील
10. अहेरी : धर्मरावबाबा आत्राम
11. कळवण : नितीन पवार
12. इंदापूर : दत्ता भरणे
13. उदगीर : संजय बनसोडे
14. पुसद : इंद्रनील नाईक
15. वाई, खंडाळा, महाबळेश्वर : मकरंद आबा पाटील
16. मावळ : सुनील शेळके
17. अमळनेर : अनिल पाटील
18. जुन्नर : अतुल बेनके
19. वडगाव शेरी : सुनील टिंगरे
20. पिंपरी : अण्णा बनसोडे

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+