शेतकऱ्यांना आता वीज बिल भरायची गरज नाही- अजित पवार, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात 'या' तारखेला पैसे

नाशिक - "शेतकऱ्यांचे शेतीचे वीज बील माफ केले आहे. मागचे पण आणि पुढचेही वीज बिल भरायचे नाहीय. वायरमन विचारायला आला तर त्याला माझं नाव सांगा. काळजी करु नका हे सरकार तुमच्या पाठीशी आहे." असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यासह लाडकी बहिण योजनेचे जुलै आणि ऑगस्टचे पैसे 17 ऑगस्टला खात्यात येतील असेही ते म्हणाले.

राज्यात एकीकडे लाडकी बहिण योजना सुरु झाल्यानंतर मोठी टीकाटीप्पणी सुरु असतानाच आज अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठे वक्तव्य केले आहे. आता शेतकरी बांधवांना वीज बील भरण्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे तर हे वक्तव्य विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केल्याचं आता बोललं जात आहे.

Ajit Pawar s public respect journey starts from Nashik Maharashtra Assembly Election 2024

वीज कापायला आले तर हे सांगा

अजित पवार म्हणाले, राज्यात आम्ही लाडक्या बहिणी योजनेसह लाडका भाऊ योजना आणली. या महिला आणि युवा वर्गाची राज्य सरकारने काळजी घेतली असून आता आमच्या शेतकरी भावांना वीज बिल भरण्याची आवश्यकता नाही असं त्यांनी म्हटलं आहे. हा दावा करताना अजित पवार यांनी वीज कनेक्शन कापण्यासाठी वायरमन आला तर त्याला अजित दादांनी वीज बिल भरायची गरज नाही हे सांगितले, असं त्यांना सांगा, असेही म्हणाले.अर्थात शेतकऱ्यांना वीज बिल भरावे लागणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं.

नेमके काय म्हणाले अजित पवार?

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आता शेतीचे वीज बिल भरावे लागणार नाही. राज्य सरकारच्या सौरपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना वीजेवर अवलंबून राहावे लागणार नाही असे ते म्हणाले. सौर ऊर्जेच्या माध्यमातून एकही पैसा न भरता सौर पंपाचा वापर करून आता शेतीला पाणी देणे शक्य होणार आहे, हेही अजित पवार यांनी म्हटले आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लाडकी बहिण योजनेचे पैसे 17 ऑगस्टला खात्यात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्य सरकारकडून येत्या रक्षाबंधनाच्या आधी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैसे देण्यात येणार आहेत. आम्ही अनेक योजना या जनतेसाठी आणल्या आहेत आणि या योजना आणताना मी अभ्यास केला. शेतकऱ्याला त्यांच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. त्यामुळे आम्ही काम करत आहोत.

गरीब महिलांसाठी ही योजना

नाशिकमध्ये आमचं आज उत्साहात स्वागत करण्यात आलं आहे. आता इथे मला काही बहिणींनी राखी बांधली. रक्षाबंधन साजरा केला. या रक्षाबंधनाच्या निमित्त आम्ही या राज्यातील सर्व महिलांना लाडकी बहीण योजना आणली आहे. गरीब महिलांकरिता ही योजना आम्ही आणली आहे. ही योजना राबवायला मी कुठही कमी पडणार नाही हा शब्द तुम्हालक देत आहे. येत्या 17 तारखेला जुलै आणि ऑगस्टचे पैसे खात्यात जमा होणार आहेत", अशी महत्त्वाची माहिती अजित पवारांनी दिली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+