मोठी बातमी! महायुतीत 278 पैकी 11 जागांवर घोडं अडलं! अजित पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं
Ajit Pawar on Mahayuti seat allocation : "महायुतीत 278 पैकी 11 जागा कुणाला यावर आमचं एकमत व्हायचं राहीलं आहे बाकी सर्व जागांचं वाटप ठरलं." अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी सांगितलं.
आज पत्रकार परिषद घेत त्यांनी ही माहिती दिली तसंच कोणतेही वृत्त देताना तारतम्य बाळगा कोणी कुणाला सोडचिठ्ठी दिली किंवा कोण कुठं जातयं, याचा पत्ता कट, त्याचा पत्ता कट हे आम्ही सांगितल्याशिवाय तुम्ही वृत्त देऊ नका असेही माध्यमांना म्हटलं आहे.

अजित पवार म्हणाले, तीन तीन पक्षांची महायुती आणि महाविकास आघाडी तयार झाली आहे. इतर पक्ष आपापली भूमिका मांडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली. आज दुसऱ्या यादीत सात लोकांची यादी जाहीर केली.
278 पैकी 11 जांगाबद्दल चर्चा सुरु
अजित पवार म्हणाले, माझीसर्वांना विनंती आहे की, जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत याचा पत्ता कट, त्याचा पत्ता कट असे वृत्त देऊ नका. काल आमचा पुर्ण दिवस दिल्लीत गेला. आजही दिल्लीत आमचे काही लोक थांबले आहेत. स्पष्ट सांगायचे झाल्यास महायुतीतील 278 पैकी 11 जांगाबद्दल विभागणी बाकी आहे. बाकी मार्ग निघाला आहे.
फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर आम्ही चालतोय
अजित पवार म्हणाले, आम्ही फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर आम्ही चालत आहोत आणि चालत राहणार आहे. आम्ही अल्पसंख्यांक समाजालाही आमच्या पक्षात प्रतिनिधीत्व देत आहोत. त्यात सना मलिक यांना आम्ही अनुशक्तीनगर येथून उमेदवारी दिली आहे. झिशान सिद्दीकी यांना आम्ही दुसऱ्यांदा संधी दिली आहे. प्रतापराव चिखलीकर यांना लोहा येथून उमेदवारी दिली आहे.
विकासाचा मुद्दे घेऊन लोकांसमोर जात आहोत
अजित पवार म्हणाले, आम्ही दोन याद्या जाहीर केल्या आहेत, त्यामुळे आता आम्ही कुठल्याही परिस्थितीत दोन दिवसांत उरलेल्या सर्व जागा जाहीर करणार आहोत. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षासोबत आम्ही युती केली आहे. विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर चाललो आहोत.
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाशी युती
अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र आमची विचारधारा आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची विचारधारा मिळती-जुळती आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाशी युती केल्याचे आज जाहीर करत आहोत. या पक्षाचे अस्तित्व ठेवून संजयभय्या सोनवणे आणि त्यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत काम करणार आहे. राज्याचे भले व्हावे आणि वेगवेगळ्या भागातील लोकांना उमेदवारीची संधी मिळावी हा दृष्टीकोनही आमचा आहे.
(हे वृत्त अपडेट होत आहे...)












Click it and Unblock the Notifications