पायलटचा तो शेवटचा 'मेसेज' आणि काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, विमानात तांत्रिक बिघाड,घटनेची चौकशी होणार
Ajit Pawar News Maharashtra Dy CM Dies in Baramati Plane Crash : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या अपघातात अजित पवारांसह विमानातील सर्व ६ जणांचा मृत्यू झाला असून, लँडिंगच्या अवघ्या ५ मिनिटांपूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पायलटचा तो शेवटचा 'मेसेज' आणि काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
मीडिया रिपोर्टनुसार,, हे विमान मुंबईहून बारामतीसाठी सकाळी ८:१० वाजता रवाना झाले होते. बारामती विमानतळावर उतरण्यासाठी केवळ ५ मिनिटे उरली असताना पायलटच्या लक्षात विमानातील तांत्रिक बिघाड आला.
इमर्जन्सी कॉल: पायलटने तातडीने बारामती एटीसीला (ATC) तांत्रिक बिघाडाची माहिती दिली आणि लँडिंगची परवानगी मागितली.
परवानगी आणि मेडिकल अलर्ट: एटीसीने लँडिंगची परवानगी दिली होती आणि खबरदारी म्हणून धावपट्टीवर मेडिकल टीम सज्ज ठेवण्यास सांगितले होते.
क्षणार्धात घात: मात्र, विमान धावपट्टीच्या दिशेने येत असताना जमिनीपासून साधारण १०० फूट उंचीवर असतानाच ते कोसळले आणि त्याला भीषण आग लागली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भावूक आवाहन आणि चौकशीचे आदेश
या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, "आज मी माझा मोठा भाऊ गमावला आहे. हे दुःख डोंगराएवढे मोठे आहे. हा केवळ एका कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचा मोठा तोटा आहे." दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
"या विमान अपघाताची सखोल चौकशी केली जाईल. तांत्रिक बिघाड कसा झाला आणि कोठे चूक झाली, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. एआयबी (AAIB) या घटनेचा तपास करेल जेणेकरून भविष्यात असे अपघात पुन्हा होणार नाहीत."
अपघातातील मृतांची अधिकृत माहिती
या दुर्दैवी घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत PSO विदीप जाधव, पायलट सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, पिंकी माळी आणि अन्य एका फ्लाईट अटेंडंटचा समावेश आहे.












Click it and Unblock the Notifications