Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अजित पवार यांना झटका ; पिंपरी चिंचवड मधील अनेक नेते शरद पवार गटात दाखल

पुणे : पिंपरी चिंचवड शहर हा अजीत्पावर यांचा बालेकिल्ला मानला जातो. या शहराच्या जडणघडणीत अजित पवार यांचे मोलाचे योदान आहे. गेला अएक वर्षांपासून शहराच्या राजकारणावर अजित पवार यांचे वर्चस्व राहिलेले आहे. पिंपरी चिंचवड शहरात अजीत पवार याच्या मर्जीशिवाय काहीच होऊ शकत नाही, असेहातले जाते. मात्र त्याच शहरात अजित पवार यांच्या राकारणाला एकमागोमाग एक झटके बसू लागले आहेत.

Ncp

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात प्रवेश केला. राहुल भोसले, यश साने, पंकज भालेकर यांनीही शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला. त्यांच्या सोबत त्यांचे कार्यकर्ते देखील शरद पवार यांच्या गटात दाखल झाले आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून विकासकामांत भ्रष्टाचार

"मी कालच माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. आमचे भविष्यातील धोरण आम्ही निश्चित करणार आहोत. पिंपरी चिंचवड शहराकडे आपण पाहाल तर अजित पवार यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने शहराचा विकास केला होता. या शहराच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे. २०१७ साली महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आली. आणि शहराचा विकास चुकीच्या दिशेने सुरु झाला. शहरात चुकीच्या गोष्टी घडल्या. विकासकामांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. भाजपचे स्थानिक आमदार त्यासाठी जबाबदार आहेत", असा आरोप अजित गव्हाणे यांनी केला.

अजित पवारांच्या सहकाऱ्यांना पराभवाची भीती

लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाने अत्यंत खराब प्रदर्शन केले. त्यांच्या सोबत गेलेल्या अनेक लोकांना पराभव पत्करावा लागला. अजित पवार यांच्या सोबत राहिलो तर भविष्यात पराभव पत्करावा लागेल अशी भीती त्यांच्या सोबत गेलेल्या लोकांना वाटू लागली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी अनेक लोक एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची साथ सोडतील, अशी शक्यता राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रेस्तो यांनी व्यक्त केली.

पवार साहेबांच्या विचारधारेवर आमचा विश्वास

पक्षात प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. आम्ही आमची विचारधारा कधीही सोडलेली नाही. पवार साहेब गेल्या ६० वर्षांपासून महाराष्ट्र आणि केंद्रात काम करीत आहेत. त्यांच्या विचारधारेवर आमचा विश्वास आहे. अनेक लोक त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत, अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी दिली.

पूजा खेडकर प्रकरण दुर्दैवी

पूजा खेडकर यांच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे प्रकरण दुर्दैवी आहे. नीट परीक्षा प्रमाणेच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गैर प्रकार सुरु आहेत. हा राज्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. सरकारचा बेफिकीर दृष्टीकोनच अशा प्रकारांना खतपाणी घालत आहे, अशी टीका सुळे यांनी पुढे बोलताना केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+