अजित पवार "डॅमेज" कंट्रोल मोडवर
पुणे जिल्यातील पिंपरी चिंचवड शहर हा अजित पवार यांचा बालेकिल्ला आहे. या शहराच्या जडणघडणीत आणि विकासात अजित पवार यांचे मोलाचे योदान आहे. गेला अनेक वर्षांपासून शहराच्या राजकारणावर अजित पवार यांचे वर्चस्व राहिलेले आहे. पिंपरी चिंचवड शहरात अजीत पवार याच्या मर्जीशिवाय काहीच होऊ शकत नाही, असे म्हटले जाते. मात्र त्याच शहरात अजित पवार यांच्या राजकारणाला एकमागोमाग एक झटके बसू लागले.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात प्रवेश केला.राहुल भोसले, यश साने, पंकज भालेकर यांनीही शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला. त्यांच्या सोबत त्यांचे कार्यकर्ते देखील शरद पवार यांच्या गटात दाखल झाले आहेत.
अजित पवार यांचे डॅमेज कंट्रोल
बालेकिल्ल्यातच आपली कोंडी केली जात आहे, असे लक्षात येताच अजित पवार यांनी घरच्या मैदानाकडे लक्ष केंद्रित केले आणि पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकार्यांशी चर्चा केली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विश्वासू सहकारी, लोकप्रतिनिधी, पार्टी पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्याशी अजित पवार यांनी संवाद साधला. यावेळी शहरातील अनेक समस्या जाणून घेत, त्या सोडवण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे आश्वासन दिले. पक्षाच्या पुढील वाटचाली संदर्भात चर्चा केली. पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा उत्साह आणि एकजूट आपल्याला आगामी काळात नक्कीच अधिक बळकट करेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
सर्व 288 जागांचा सर्व्हे
विधानसभा निवडणुकांसाठी देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने कंबर कसली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून महाराष्ट्रातील सर्व 288 जागांचा सर्व्हे करण्यात येत आहे. महायुतीतील तिन्ही घटक पक्ष स्वतःचा सर्व्हे करणार असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर जागा वाटप या विषयावर एकत्र बसून चर्चा केली जाणार आहे. विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस महायुतीचा घटक पक्ष म्हणूनच लढणार असल्याचे अजित पवार यांनी बारामती येथे घेतलेल्या मेळाव्यात स्पष्ट केलंय.
विदर्भात 20-25 जागा लढण्याची तयारी
विदर्भात विधान सभेच्या 60 ते 65 जागा आहेत. यापैकी 20 जागा लढाव्यात असे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांचे मत आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धर्मराज बाबा अत्राम यांनी दिली आहे. काटोलचे आमदार आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याची तयारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. अद्याप जागा वाटपाची बैठक देखील झालेली नसताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने विदर्भातील जागांबद्दल विधान केल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्क सुरु झालेत.












Click it and Unblock the Notifications