लाडक्या बहिणींबाबत महत्त्वाची अपटेड; फेब्रुवारीचा हप्ता कधी? अपात्र कोण होणार? अजितदादांनी सांगितलं
महाराष्ट्रात सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबाबत रोज नवनवी अपडेट येत आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब कटुंबातील महिलांसाठी महायुती सरकारने महिन्याला १५०० रुपये देण्याची ही योजना सुरु केली आहे. या योजनेला अभूतपुर्व प्रतिसाद मिळाला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही ही योजना गेमचेंजर ठरली होती. सुमारे अडीच कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. आता याच लाडक्या बहिणींच्या अर्जाची तपासणी सुरु असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता याच चर्चांबाबत काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलंय.

काय म्हणाले अजितदादा?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल आणि आजही नाशिकच्या कार्यक्रमात लाडकी बहिण योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. ते म्हणाले, जानेवारीत जेवढ्या महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता भेटला तेवढ्याच बहिणींना फेब्रुवारीतही लाडक्या बहिणीचा हप्ता मिळे. आठव्या हप्त्यासाठी ३ हजार ५०० कोटी रुपयांच्या चेकवर मी सही केलेली आहे. गेल्यावेळी फक्त पाच लाख महिला अपात्र ठरल्या होत्या. आताही २ कोटी ४१ लाख महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे.
कधी मिळेल पैसे?
अजित पवारांनी लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार हे सांगून टाकले. ते म्हणाले, आठवा हप्ता 1500 रुपये लाडक्या बहिणींना लवकरच वाटप केला जाईल. त्यासाठी 3,500 कोटी रुपये ठेवण्यात आलेले आहेत. 8 वा हप्ता वाटप येत्या आठ दिवसांत होईल, असे ते म्हणाले. म्हणजेच टप्प्याटप्प्याने 24 तारखेपासून पैसे भेटायला सुरुवात होईल. 24 तारखेला सोमवार येतो. त्यानंतर 25, 26, 27 आणि 28 तारीखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेले असतील.
अपात्र कोण होणार?
लाडकी बहिण योजना सुरु केली तेव्हा सगळ्याच बहिणींचे अर्ज मंजूर केल्याची कबुली अजित पवारांनी नुकतीच एका कार्यक्रमात दिली होती. आता काही लाडक्या बहिणींचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त किंवा अनेकींच्या नावावर चारचाकी गाडी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ज्या महिला शासनाच्या अटी व शर्तीमध्ये बसणार नाहीत, त्या अपात्र ठरविण्यात येणार आहे. मात्र ज्यांना आत्तापर्यंत पैसे देण्यात आले त्या महिलांकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.












Click it and Unblock the Notifications