Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दोन्ही पवारांचा वेगवेगळा पाडवा उत्सव; अजित पवार व शरद पवारांनी सांगितलं अगदी मनातलं...

बारामती : बारामतीमध्ये दिवाळी पाडव्याचा उत्सव साजरा करण्याची परंपरा होती. मात्र यंदा पहिल्यांदाच दोन ठिकाणी पाडवा साजरा झाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोविंद बागेत तर अजित पवारांनी काटेवाडीत पाडवा साजरा केला. यापूर्वी दिवाळी पाडव्याला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येत होतं. मात्र यावेळी पवार गटाचे दोन पाडवा उत्सव साजरे झाले. यावेळी दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याची भेट घेण्यासाठी गर्दी केल्याचं दिसून आलं. या दोन पाडव्यांबाबत दोन्ही पवारांनी आपापल्या पद्धतीने प्रतिक्रीया दिल्या.

Sharad Pawar Daiwali Padwa

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवारांनी आपल्या कुटुंबासह काटेवाडीत पाडवा साजरा केला. अजित पवारांसह पत्नी खा. सुनेत्रा पवार, मुले पार्थ व जय पवार तेथे उपस्थित होते. पवार कुटुंबाला भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, आलेल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आज अनेक लाडक्या बहिणी भेटण्यासाठी आल्या. तरुणांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांनी भेट घेतली. माझे जे जुने पत्रकार मित्र आहे, त्यांना आठवत असेल पूर्वी काटेवाडीमध्येच पाडवा साजरा होत होता. साहेबांना भेटण्यासाठी काटेवाडीमध्ये सर्व कार्यकर्ते यायचे. पुढे गोविंदबागेची जागा निवडली गेली.

बारामतीमधील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी सोईचं पडतं, म्हणून त्यानंतर पाडवा गोविंद बागेत साजरा व्हायला लागला. आजही भेटणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी खूप होती. लोकांनाही घरी जायची घाई असते, सण साजरा करायचा असतो. त्यामुळे गर्दी विभागली जावी, कार्यकर्त्यांना लवकर घरी जाता यावं म्हणून मी गोविंद बागेत गेलो नाही. काटेवाडीतच पाडवा साजरा केला. ज्या कार्यकर्त्यांना साहेबांना भेटायचं होतं ते त्यांना भेटले. ज्यांना मला भेटायचं होतं, ते मला भेटले. त्यामुळे गर्दी विभागली गेली, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

शरद पवार म्हणाले, मी अस्वस्थ...

पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच दोन ठिकाणी पाडवा साजरा झाला. यावर शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, दोन ठिकाणी पाडवा व्हायला नको, अशी लोकांची भावना आहे. चांगली गोष्ट आहे. मला आनंद आहे. कार्यकर्त्यांची भावना आहे. अनेक वर्षाची परंपरा आहे. पाडवा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. या प्रांगणामध्ये आम्ही सर्वजण जमतो आणि ही जुनी पद्धत आहे. ही कायम राहिली असती तर मला आनंद झाला असता. पण ठिक आहे. लोकांना डबल ठिकाणी जावं लागलं. त्यांना त्याचा त्रास झाला. त्यामुळे मी अस्वस्थ आहे, असंही शरद पवार म्हणालेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+