देवेंद्र फडणवीस निश्चिंत पण का आला अजित पवारांच्या पोटात गोळा! वाचा हा किस्सा
मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज एकादशीच्या दिवशी सारखा पांडूरंगा..पांडूरंगा असा धावा केला. विशेष म्हणजे एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्चिंत असतानाच अजित पवारांच्या पोटात गोळा आला होता... आता तुम्ही विचाराल की, तो का आला तर त्याचे महत्वाचे कारणही आहे. खुद्द अजित पवारांनीच हा किस्सा सांगितला चला जाणून घेऊया.
कार्यक्रमात सांगितला किस्सा
गडचिरोली जिल्ह्यातील वडलापेठ येथील सुरजागड इस्पात प्रा. लि. या आयरन स्पोंज उत्पादन करणाऱ्या कारखान्याचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. या सोहळ्यासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज हेलिकाॅप्टरने एकत्र प्रवास केला. या प्रवासादरम्यानचा हा किस्सा आहे.

हेलिकाॅप्टर जेव्हा ढगात गेले त्यानंतर काही काळ ते भरकटले पण नंतर पायलटच्या कौशल्यामुळे सर्व काही सुरळीत झाले व आत बसले्ल्या या नेत्यांसह अन्य नेत्यांचा प्रवास सुखरूप झाला. यानंतर हा किस्सा त्यांनी भरकार्यक्रमात सांगितला.
अजित पवारांनी सांगितला किस्सा?
सुरुवातीला बर वाटले पण नंतर ढगात जे हेलिकाॅप्टर शिरले त्यानंतर जिकडे तिकडे ढगच दिसत होते. मी देवेंद्र फडणवीसांना म्हटले बघा जरा बाहेर काही दिसत नाही, जमीन दिसेना झाड दिसेना, आपण ढगात चाललोय.
देवेंद्र फडणवीसांचे उत्तर काय?
अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले "काही काळजी करु नका. आतापर्यंत माझे सहा अपघात झाले तरीही मला काहीही झाले नाही, त्यामुळे तुम्हालाही काळजी होणार नाही. मी जेव्हा विमान, हेलिकाॅप्टरमध्ये असतो तेव्हा मला काही होत नाही. मला याचा अनुभव आहे. माझे अनेक अपघात झाले पण माझ्या नखाला धक्का लागला नाही."
अरे बाबा पोटात गोळा आलाय..
फडणवीसांच्या वक्तव्यावर अजित पवार पुढे सागंतात की.. अरे बाबा हे काय सांगतोय, पोटात गोळा आलाय, एकतर आज आषाढी एकादशी सारखे पांडुरंगा..पांडुरंगा ..म्हणत होतो. अन् या महाराजांचे (देवेंद्र फडणवीसांचे) आम्हाला उपदेश चालू होते की, काही काळजी करु नका.खरोखरच ते येईपर्यंत ते इतके निवांत होते. बापदादाच्या पुण्याई त्यांच्यामागे आहे.
..अन् जमीन दिसली एकदाची
"आम्ही ढगात होतो काहीवेळ जमीन न दिसल्याने मी चिंतेत होतो. धाकधूकही होती. पण काहीवेळाने मला उदय सामंत म्हणाले, दादा खाली जमीन दिसायला लागली. तेव् माझ्या जिवात जीव आला. गमतीचा भाग जाऊ द्या पण एकंदरीत सर्वांनीच काळजी घ्यायला हवी."
खराब हवामानामुळे प्रकार
खराब हवामानामुळे अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर ढगांमध्ये भरकटले होते. दृष्यमानता अत्यंत कमी झाली होती. पायलटने हेलिकॉप्टर मोठ्या कौशल्याने जमिनीवर उतरवले. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.












Click it and Unblock the Notifications