Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुख्यमंत्रीपद मागितल्याचे वृत्त अजित पवारांनी फेटाळलं; म्हणाले- महायुती म्हणूनच निवडणूक लढणार

Ajit Pawar on Amit Shah : बिहार पॅटर्न राबवा अन् विधानसभा निवडणुकीनंतर मला मुख्यमंत्री करा, असा प्रस्ताव राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शाह यांच्यासमोर मांडल्याची माहिती समोर आली. एका इंग्रजी दैनिकाने हे वृत्त प्रकाशित केल्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आहे. मुंबई विमानतळाच्या भेटीत असा प्रस्ताव दादांनी शहांपुढे ठेवल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, खुद्द अजित पवार यांनी हे वृ्त्त फेटाळले आहे. मी असला कोणताही प्रस्ताव ठेवलेला नाही. धादांत खोटी बातमी चालविली जात आहे, असे ते म्हणाले.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार म्हणाले की, आगामी काळात आम्ही महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. मी असा कोणताही प्रस्ताव ठेवण्याचे कारण नाही. काल झालेल्या बैठकीत आम्ही केवळ काही जागांवर चर्चा केली. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने काय तयारी करता येईल, यावर चर्चा झाली. कोणीतरी काहीही बातमी देतो, अन् त्यावर तुम्ही लोक विश्वास ठेवता. मुळात ही बातमी धादांत खोटी असल्याचे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar- Amit Shaha

अजित पवार यांना महायुती विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे लढायला सांगणार, या चर्चेविषयी अजित पवार यांना माध्यमांनी प्रश्न केला. त्यावर अजित पवार म्हणाले की, जे लोक ही चर्चा करत आहेत, त्यांनाच याबद्दल विचारा. मी इतरांनी केलेल्या वक्तव्यावर बोलणार नाही. सध्या आमचं लक्ष्य एकच आहे ते म्हणजे, महायुतीच्या सर्व घटकपक्षांना फायदा मिळवून देणे. जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून आम्ही लोकांना सरकारी योजना आणि कार्यक्रमाबद्दल सांगतोय. लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची आहे. सगळे घटकपक्ष आपापल्या परीने त्याचा प्रचार करत आहेत. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीमधील सर्व घटकपक्षांना मिळाला पाहिजे, असा दावा त्यांनी केला.

मीच सांगितले माझा फोटो लावू नका

काही दिवसांपूर्वी अजित गटाकडून सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेची जाहिरात करणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. या व्हिडिओत लाडकी बहीण योजनेच्या नावापूर्वीचा मुख्यमंत्री हा शब्द वगळण्यात आला होता. यानंतर एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर अमित शाह यांच्या स्वागतासाठी जे बॅनर्स लावले होते, त्या बॅनरवरुन अजित पवारांचा फोटो गायब होता. याबाबत अजित पवार यांना विचारले असता त्यांनी मिश्कीलपणे म्हटले की, मीच एकनाथ शिंदेंना सांगितलं होतं की, माझा फोटो लावू नका. सध्या सगळीकडे माझे फारच फोटो दिसत आहेत. त्यामुळे मीच त्यांना माझा फोटो लावू नका, असे सांगून पत्रकारांना मिश्किल उत्तर दिले.

शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा

अजित पवार म्हणाले की, राज्यात कापूस, सोयाबिनचा प्रश्न महत्त्वाचा आहे. सध्या आपल्याला कांदा निर्यात बंदी होऊ द्यायची नाही. शेतकऱ्यांना दोन पैसे त्यातून मिळत असतील तर मे मिळायला हवे अशा विषयावर माझी अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+