Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ajit Pawar Dead : अजित पवारांचं विमान कसं कोसळलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितली अंगावर काटा आणणारी घटना

Ajit Pawar Dead : अजित पवारांचं विमान कसं कोसळलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितली अंगावर काटा आणणारी घटना!
बारामती: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी आज सकाळी समोर आली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते अजित पवार यांचा बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अजितदादांसह विमानात असलेल्या एकूण ५ जणांचा अंत झाला असून, या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

 

Ajit Pawar Dead

नेमकं काय घडलं?

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. सकाळी ८:१० च्या सुमारास त्यांनी मुंबईहून बारामतीसाठी टेकऑफ केले होते. सकाळी साधारण ८:४५ ते ९:०० च्या दरम्यान विमान बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या तयारीत असतानाच ही भीषण दुर्घटना घडली. धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते जवळच्या शेतात कोसळले. कोसळताच विमानाने भीषण पेट घेतला आणि विमानाचा अक्षरशः कोळसा झाला.

हे ही वाचा : महाराष्ट्राचा धगधगता 'अजित' सुर्य मावळला; दादांचे 'ते' स्वप्न राहिले अधुरे, NCPचे काय होणार?

प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरकाप उडवणारी हकीकत

या अपघाताच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका महिला प्रत्यक्षदर्शीने दिलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे. त्यांनी सांगितले की,  "विमान पहिल्यांदा वरून गेलं, पण पुन्हा गावातून खालून येत असल्यासारखं वाटलं. अचानक विमान हवेतच फिरलं आणि जोरात जमिनीला धडकलं. धडक होताच मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका भयानक होता की आमच्या घरापर्यंत विमानाचे तुकडे उडाले. विमान जागेवरच फिरून काही सेकंदात पेटलं, आम्हाला काहीच करायची संधी मिळाली नाही."

विमानात कोण कोण होते? (मृतांची नावे)

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) दिलेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात खालील पाच जणांचा मृत्यू झाला आहे:

  • अजित पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र) 
  • विदीप जाधव (मुंबई पोलीस PSO) 
  • पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट) 
  • कॅप्टन सुमित कपूर (पायलट) 
  • कॅप्टन शांभवी पाठक (को-पायलट)

महाराष्ट्र एका मोठ्या नेत्याला मुकला

अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील एक 'पॉवरहाऊस' मानले जात होते. प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि कामाचा झपाटा यामुळे ते विरोधकांमध्येही आदराचे स्थान राखून होते. आज बारामतीत त्यांच्या चार सभांचे आयोजन करण्यात आले होते, पण नियतीने त्याआधीच त्यांच्यावर घाला घातला.

या घटनेमुळे बारामतीसह संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. विमानतळ प्रशासनाकडून या अपघाताच्या तांत्रिक कारणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+