600 रिक्त पदांसाठी 25 हजारांहून अधिक इच्छुक, विमानतळावर चेंगराचेंगरीची स्थिती! व्हिडिओ व्हायरल
मुंबई - एअर इंडियामध्ये जॉब मिळवण्यासाठी 25000 पेक्षा जास्त बेरोजगार तरुणांनी गर्दी केल्याचा व्हिडीओ समोर आला. मुंबई विमानतळावरील अशाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यातून एकूणच देशातील बेरोजगारीची स्थिती समोर आली आहे.
व्हिडिओ व्हायरल
देशात सर्वात जास्त तरुणाईची संख्या आहे. मात्र त्याचबरोबर देशामध्ये बेरोजगारी तितक्याच पटीने वाढत आहे. याचा अंदाज तेव्हा येतो जेव्हा एका एका नोकरीच्या जागेसाठी शेकडो अर्ज केले जातात. अनेक योजना राबवून देखील देशातील बेरोजगारी कमी होण्याचे नाव घेत नाही. दरम्यान, मुंबई विमानतळावरील अशाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आज होत्या मुलाखती
वॉक-इन मुलाखत देण्यासाठी हजारो लोक मंगळवारी 16 जुलै रोजी मुंबईतील कलिना येथील एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये पोहोचले होते. कंपनीने 'हँडीमन' पदासाठी वॉक-इन मुलाखती घेतल्या होत्या. एकूण 2,216 पदांसाठी भरती होणार होती. मात्र एवढ्या कमी जागा असतानाही भरती कार्यालयाबाहेर मोठा जमाव जमला आणि परिस्थिती काही वेळातच नियंत्रणाबाहेर गेली. अर्जदारांना त्यांचा बायोडेटा जमा करून सोडण्यास सांगण्यात आले.
लोडरच्या 600 जागांसाठी 25,000 अर्जदार
हा व्हिडीओ मंगळवारीचा मुंबई विमानतळाबाहेरील आहेत. लोडरच्या 600 जागांसाठी 25,000 हून अधिक अर्जदार विमानतळावर पोहोचले होते. देशातील बेरोजगारीची स्थिती व्हिडिओ वरून दिसून येत आहे.
अर्जदार फॉर्म काऊंटरपर्यंत पोहोचण्यासाठी एकमेकांशी धक्काबुक्की करत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. अनेक इच्छुकांना खाण्या-पिण्याशिवाय तासतासभर रांगेत थांबावे लागले. त्यामुळे अनेक जणांनी अस्वस्थ वाटू लागल्याची तक्रार केली.












Click it and Unblock the Notifications