राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा; सोयाबीन खरेदीला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, परंतु
Extension of date for purchase of soybeans : महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील सोयाबीन खरेदी सुरुच ठेवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुदतवाढ दिली आहे.
सोयाबीन खरेदी 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही खरेदी आजपर्यंत म्हणजे 13 जानेवारी पर्यंत करण्याचे होते निर्देश होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौहान यांच्याशी फोनवरुन संपर्क साधून मुदतवाढ दिली जावी, अशी मागणी केली होती.

शेतकऱ्यांना हमीभावात करता येणार विक्री
महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरुन केंद्र सरकारनं सोयाबीन खरेदीची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री बाकी आहे. मुदवाढ दिल्यामुळं हमीभावात शेतकऱ्यांच्या सोयाबीनची विक्री करता येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरुन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंहे चौहान यांनी हा निर्णय घेतला आहे.
फडणवीसांनी मानले केंद्राचे आभार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली होती. त्यांनी कृषीमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा देखील केली होती. ही मागणी तातडीने कृषीमंत्री चौहान यांनी मान्य करत 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे आमच्या शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळेल असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. तर त्यांनी नरेंद्र मोदींचे देखील आभार मानले.












Click it and Unblock the Notifications