Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जरांगे पाटील इमोशनल, तर संभाजी राजांचा थेट अजित पवारांना इशारा; बीडचा मोर्चा गाजला

बीडमधील सर्वपक्षीय मोर्चात आज संभाजीराजे छत्रपती व मनोज जरांगे पाटील यांचे भाषण गाजले. जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्‍यांना हात जोडून आरोपींना शिक्षा करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे संभाजीराजेंचा रुद्रावतार दिसला. राष्ट्रवादीच्या नेत्याचे नाव न घेता त्यांनी थेट अजित पवारांना इशारा दिला.

Manoj Jarange Patil

काय म्हणाले संभाजीराजे?

भाषणात संभाजीराजे यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव घेतले. ते म्हणाले, आरोपींचा जो म्होरक्या आहे, तो धनंजय मुंडे आहे. हे मी नाव घेऊन सांगतोय. आश्रयदात्या धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका, असं मी सांगितलं होतं. आता त्यांना पालमंत्रीपद दिलं तरी मी पालकत्व घेईल. मला दहशत चालत नाही. येथे कुणी दहशत करत असेल, तर मी येथे येईल. बीडचा बिहार करायचाय का..? असा सवाल करत संभाजी राजे यांनी थेट अजित पवारांनाच इशारा दिला. ते म्हणाले, "अजितदादा तुम्ही प्रकटपणाने बोलता. म्हणता, माझी काम करण्याची पद्धत ही आहे. तुम्ही आता काम करून दाखवाच. तुमची हिंमत असेल. तुमच्या धमक असेल, तर आता काम करून दाखवा. आरोपींना पाठीशी घालू नका, असा थेट इशाराच संभाजीराजेंनी दिला.

जरांगे पाटील भावूक

मोर्चेकऱ्यांसमोर जरांगे पाटील यांनीही भावना व्यक्त केल्या. ते म्हणले, मी या लेकरांचं तोंड पाहू शकत नाही. या लेकरांना आता त्यांचा बाप दिसणार नाही. या लेकरांच्या पाठीवर हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेलाय. तुमची आमची भाषणं होत राहतील, पण या लेकरांचं काय? मी हात जोडून सांगतोय. सगळे मुख्यमंत्र्‍यांकडे जा. ज्या-ज्या लोकांची नावे या प्रकरणात आहेत, त्यांना अटक करा. तुमचा नेता आमचा दुश्मन नाही. विरोधी पक्ष माझा सासरा नाही. पण आरोपींना कठोर शिक्षा करा.

मराठे आहोत मराठे

जरांगे पाटील यांचा आक्रमकपणाही दिसला. ते म्हणाले, पुढच्या काळात सावध रहा. आमच्या १५४ च्या नोटीशीचं पोरगं सरकारला सापडलं. त्याला आत घातलं. आणि इथं खूनातील आरोपी सरकारला सापडत नाही. सरकार गोरगरीबांना न्याय देणार की नाही? आता या दहशतीविरोधात सर्व जिल्ह्यात तयारी करा. मागे हटू नका. ते आणखी हल्ले करतील. आता वाट पहायची नाही. जशास तसे उत्तर द्यायचे. अरे, आपण मराठे आहोत मराठे... पाणीच पाजायचं त्यांना... असं म्हणत त्यांनी आरोपींना थेट इशारा दिला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+