शिंदे-भाजपने महाराष्ट्राची वाट लावली, गृहमंत्री कुटुंब तोडण्यात व्यस्त; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Aditya Thackeray on Shinde Fadnavis : बदलापूर शहरातील एका शाळेत दोन मुलींवर अत्याचाराच्या घटनेनंतर गुरुवारी पुन्हा बदलापूर चर्चेत आले. ते म्हणजे बदलापूर रेल्वेस्थानकात गुरुवारी झालेला गोळीबार. याप्रकरणावरुन आता आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीसांवर निशाणा साधला. आमच्या सुसंस्कृत महाराष्ट्राची वाट लावली ह्या शिंदे-भाजपाने, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.
आदित्य ठाकरे यांनी बदलापूरातील गोळीबार प्रकरणावरून निशाणा साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळतच चालली आहे. स्त्रियांवर होणारे अत्याचार असोत, कोयता गॅंगसदृश घटना असोत की वारंवार होणारे गोळीबार महाराष्ट्रातील शहरं आणि गावं या गुन्हेगारीच्या घटनांनी ग्रासून गेलेली आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागले.

नेमके आदित्य ठाकरेंचे ट्विट काय?
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळतच चाललीये. स्त्रियांवर होणारे अत्याचार असोत, कोयता गॅंगसदृश घटना असोत की वारंवार होणारे गोळीबार.... महाराष्ट्रातील शहरं आणि गावं ह्या गुन्हेगारीने ग्रासून गेलेली आहेत. काल तर बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार झाला! आणि राज्याचे गृहमंत्री मात्र पक्ष फोडणे, कुटुंब तोडणे, खोटा इतिहास शिकवणे, प्रचार करणे ह्यातच व्यस्त आहेत. आमच्या सुसंस्कृत महाराष्ट्राची वाट लावली ह्या शिंदे-भाजपाने!, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळतच चाललीये. स्त्रियांवर होणारे अत्याचार असोत, कोयता गॅंगसदृश घटना असोत की वारंवार होणारे गोळीबार.... महाराष्ट्रातील शहरं आणि गावं ह्या गुन्हेगारीने ग्रासून गेलेली आहेत....
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 6, 2024
काल तर बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार झाला!
आणि…
बदलापूरमधील शाळेत लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना आता बदालपूर रेल्वे स्थानकावर गोळीबाराची घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी हा गोळीबार झाला. यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून आता ठाकरे गटाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-भाजपा सरकारवर हल्ला चढवला आहे.
बदलापूरात काय घडलं?
बदलापूरच्या रेल्वे स्थानकावरील एक धक्कादायक व्हिडिओ गुरुवारी समोर आला होता. यात एक तरुण स्थानकावरच गोळीबार करत असल्याचे दिसत आहे. ही घटना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात तसेच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी त्यानंतर घटनास्थळाची पाहणी केल्याचे सांगितले गेले. परंतु, अशा प्रकारची घटना घडल्याने बदलापुरात नेमकं चाललं काय, असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन!










Click it and Unblock the Notifications