Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Accident News : बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात, सांगली जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील 6 जण ठार

Sangali Accident News : बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली असून यात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. अपघातातील मृत कुटुंब हे सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावातील आहे, या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावचे कुटुंब बंगळुरुवरुन जतला ख्रिसमस सुट्टीनिमित्त गावाकडे येत असताना कंटेनर ट्रक कार गाडीवर पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

Accident News

तीन महिन्यांपूर्वीच घेतली होती कार

या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, 3 महिन्यांपूर्वीच घेतलेल्या कारमध्ये इग्गाप्पागोळ यांनी कार खरेदी केली. KA 01 ND 1536 व्होल्वो कारने ते गावी येत होते. विशेष म्हणजे चंद्रम यांनी 21 ऑगस्ट 2024 रोजी व्होल्वो कार खरेदी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरू जिल्ह्यातील नेलमंगळा तालुक्यातील तळकेरेजवळ ही दुर्घटना घडली आहे. ख्रिसमसनिमित्त सुट्टी असल्याने इप्पाळगोळ हे कुटुंब आपल्या गावकडे येत होते. त्यावेळी अचानक कंटेनर ट्रक कार गाडीवर पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

अशी आहेत मृतांची नावे

मृतांमध्ये पती चंद्रम इगाप्पागोळ (४६), पत्नी धोराबाई (४०) मुलगा गण (16), मुली दिक्षा (10), आर्या (6), चंद्रम इगाप्पागोळ यांच्या भावाच्या पत्नी विजयालक्ष्मी (३५) यांचे देखील निधन झाले आहे.

बंगळुरू येथे सॉफ्टवेअर कंपनीत करतात काम

चंद्रम इगाप्पागोळ हे मूळचे सांगलीच्या जत तालुक्यातील मोराबागी गावातील रहिवासी आहेत. ते बंगळुरू येथे सॉफ्टवेअर कंपनीत होते, या दुर्घटनेत त्यांचं संपूर्ण कुटुंबच मृत्यूमुखी पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी नेलमंगला वाहतूक पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+