अब्दुल सत्तारांचा चौफेर उधळणारा वारु ठाकरे गट रोखणार? पहा कशी आहे, सोयगाव-सिल्लोडची स्थिती

Abdul Sattar Vs Suresh Bankar : सिल्लोड - अब्दुल सत्तार कोण? तर वादाचं बिऱ्हाड कायम पाठीवर असणारा मंत्री. होय... कायम वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या अब्दुल सत्तारांना ओळखत नाही, असा माणूस किमान मराठवाड्यात तरी सापडणार नाही. सत्तार आणि वाद हे जणू समीकरण झालं आहे.

अब्दुल सत्तार यावेळी विजयाचा चौकार मारणार का? हा खरा प्रश्न आहे. वेगवेगळ्या पक्षात उड्या मारुन मंत्रीपद पदरात पाडणारे सत्तार यावेळीही शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार असतील अशी शक्यता आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी खासदार माणिकराव पालोदकर यांचे चिरंजीव प्रभाकर पालोदकर हे पुन्हा विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.

Abdul Sattar s victory record will stop Uddhav Thackeray s Shivsena Soygaon-Sillod Constituency

प्रभाकर पालोदकर हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडुन निवडणूक लढवतील, अशीही शक्यता आहे. यावेळी सत्तारांना माजीमंत्री रावसाहेब दानवे यांची साथ मिळेल का हा प्रश्न असून गेल्यावेळीच्या पराभवाचा बदला पालोदकर घेतील का, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा वन इंडियाचा हा प्रयत्न...

Take a Poll

सत्तार आणि वादाचं जुनं समीकरण

आपल्या बोलण्यातून वाद ओढवून घेणारे नेते म्हणून सत्तारांकडे पाहिले जाते. दोन वर्षांपूर्वी सिल्लोड महोत्सवाला सत्तारांनी 15 कोटींचा निधी गोळा करायला लावल्याचा आरोप खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनीच केला होता, सभागृहात त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाल्यानंतर तेव्हा बराच गोंधळही उडाला होता.

टीईटी घोटाळा, महिला खासदाराबद्दल वापरलेली शिवराळ भाषा, मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेची परस्पर केलेली घोषणा, या सगळ्यांमुळे सत्तार कायम वादाच्या केंद्रस्थानी राहिलेत. एकदा तर 'दारु पिता का..?' असं सत्तारांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच विचारलं होतं. हेच सत्तार त्यांच्या सिल्लोड मतदारसंघातून यावेळी चौथ्यांदा विजयाचं गणित आखत आहेत.

कशी आहे सत्तारांची कारकिर्द

सोयगाव-सिल्लोड हा सत्तारांचा मतदारसंघ. या मतदारसंघात 1994, 1999 आणि 2004 अशा तीन विधानसभा ते हरले. 2009 मध्ये काँग्रेसकडून ते पहिल्यांदा विधानसभेवर गेले. 2014 ला मोदीलाट होती. मात्र स्थानिक राजकारणात सत्तारांनी पालोदकरांच्या साथीनं मराठा-राजपूत-मुस्लिम मतदारांची मोट बांधली.

काँग्रेसमध्ये असूनही सत्तार यांनी भाजपच्या रावसाहेब दानवेंशी जुळवून घेत पुन्हा विजय मिळवला. 2019 ला काँग्रेसने त्यांचं तिकीट कापल्यावर ते थेट शिवसेनेत जाऊन आमदार झाले. एवढंच काय तर मंत्रीही झाले. शिवसेनेच्या फाटाफुटीत सत्तार शिंदेंच्या शिवसेनेत गेले आणि पुन्हा कॅबिनेट मंत्री झाले. सत्तारांची कारकीर्द वेगवान आणि तितकीच वादग्रस्तही राहिली.

कशी आहे यावेळची स्थिती?

सोयगाव-सिल्लोड मतदारसंघात मराठा-मुस्लिम-राजपूत मतांवर आमदार ठरतो. येथे परंपरागत सत्तार विरुद्ध भाजप असंच चित्र राहिलंय. मात्र आता सत्तार महायुतीत आहेत. तरीही दानवेंचे अर्थात भाजपचे कार्यकर्ते सत्तारांना मदत करतील का, ही शंका आहे. शिवाय शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षही सत्तारांवर दात खाऊन आहे.

गेल्याच महिन्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सिल्लोडमधुन सत्तारांविरोधात लढण्याची घोषणा केली आहे. पालोदकर हेच ठाकरेंच्या शिवसेनेत जाऊन सत्तारांविरोधात दंड थोपटतील, अशीही शक्यता आहे. या मतदारसंघातील सुमारे 50 हजार मुस्लिम मतदारांवर सत्तारांचे राजकारण चालत होते. मात्र हा समाज यंदा महायुतीच्या पाठीशी राहील का, हा प्रश्न आहे. शिवाय या तालुक्यात मराठा आरक्षण आंदोलनामुळे मनोज जरांगेंना मानणारे कार्यकर्तेही मोठे आहेत. ते सत्तारांच्या पाठीशी नक्कीच उभे राहणार नाहीत असेही दिसते.

भाजपचे कार्यकर्तेही सत्तारांवर नाराज आहेत. तर दुसरीकडे सत्तार यांच्याविरोधात दंड थोपटणारे सुरेश बानकरसह सांडू पाटील लोखंडे, ज्ञानेश्वर मोठे, इद्रीस मुलतानी हे काय निर्णय घेतात, यावरही सत्तार यांची आमदारकी अवलंबून राहणार आहे. एकंदर सत्तारांना यावेळची लढत सोप्पी नक्कीच नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+