गणेशोत्सवाच्या भंडाऱ्यातून 70 विद्यार्थी अन् 5 शिक्षकांना विषबाधा, पारोळ्यातील घटनेने खळबळ

Jalgaon News, Food Poisoning : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पारोळ्यातील शिवरे येथे गणेशोत्सवनिमित्त सारंग माध्यमिक विद्यालयात भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देण्यात आलेल्या प्रसादातून शाळेतील 70 विद्यार्थी व 4 शिक्षकांना विषबाधा झाली.

त्यापैकी 2 विद्यार्थिनींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे पारोळ्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवरे येथील सारंग माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवनिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भंडाऱ्यात डाळभात, मटकीची उसळ, माठाची भाजी व गुलाबजाम असे पदार्थ ठेवण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांचे जेवण झाल्यानंतर अचानक अनेक विद्यार्थ्यांना मळमळ होऊ लागली. काहींना उलट्याही झाल्याने सर्वत्र धावपळ उडाली.

Jalgaon News

12 ते 15 वयोगटातील 70 विद्यार्थ्यांना त्रास

मिळालेल्या माहितीनुसार, विषबाधा झालेल्या 12 ते 15 वयोगटातील एकूण 70 विद्यार्थी व 4 शिक्षकांचाही समावेश आहे. त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तामसवाडी प्राथमिक उपकेंद्राच्या वैद्यकीय पथकांसह शहरातील काही खासगी डॉक्टरांनी देखील विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरू केले केले. उपचार नंतर काही विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले तर काही जणांवर अद्यापही रुग्णालयात उपचार चालू आहेत.

काही विद्यार्थीनींवर धुळ्यात उपचार सुरू

शुक्रवारी दुपारी झालेल्या या घटनेनंतर रात्री दहा वाजेपर्यंत काही विद्यार्थ्यांवर उपचार करून त्यांना घरी पाठण्यात आले. तर पारोळा रुग्णालयातून पुढील उपचारासाठी श्रुती कैलास बेलेकर, ऐश्वर्य जगन महाले या दोन विद्यार्थिनींची प्रकृती काहीशी गंभीर असल्याने त्यांना धुळ्यात हलवण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनी कुटीर रुग्णालयात एकच गर्दी केली होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+