लालबागच्या राजाची दानपेटी मालामाल; 5 कोटी 65 लाख रोख, 4 किलो सोनं अन् 64 किलो चांदी अर्पण
Lalbaughcha Raja : महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मुंबईतील लालबागचा राजा येथील गणपती प्रसिद्ध आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेशभक्त मोठ्या संख्येनं येत असतात. दरवर्षी गणेशोत्सवात लालबागच्या राजाला भाविक रोख रक्कम, सोने आणि चांदीच्या स्वरुपात दान करत असतात.यंदाही लालबागच्या राजाच्या चरणी मोठ्या प्रमाणात दान मिळाले आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विद्यमाने यंदा लालबागच्या राजाचा 91 वा गणेशोत्सव 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत पार पडला. लालबागच्या राजाला होत असलेल्या दानाची मोजदाद सुरु करण्यात आली होती. या दानाची रक्कम मोजून पूर्ण झाली आहे. गणेशोत्सव काळात लालबागच्या राजाच्या चरणी 5 कोटी 50 लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा झाली. तर, 4 किलोपेक्षा जास्त सोनं आणि 64 किलो पेक्षा अधिक चांदी जमा झाली आहे.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवात भाविकांनी अर्पण केलेल्या दानाची मोजदाद पूर्ण झाली आहे. भाविकांनी गणेशोत्सवातील दहा दिवसात लालबागच्या राजाला 5 कोटी 65 लाख 90 हजार रोख रुपये दान केले आहेत. लालबागच्या राजाच्या गणेशाची विसर्जन मिरणूक 17 सप्टेंबरला सुरु झाली ती 18 सप्टेंबरला म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपली. आता लालबागच्या राजाला मिळालेलं दान मोजून पूर्ण झालं आहे.
लिलाव कुठं होणार?
लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांकडून अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव 21 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. लालबागच्या राजाच्या मंडपात आयोजित करण्यात आलेला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी, असं मंडळाकडून कळवण्यात आलं आहे.












Click it and Unblock the Notifications