पात्र कुटुंबाला 3 गॅस सिलिंडर मोफत, अजित पवार यांच्याकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात झाली असून अधिवेशनच्या दुस-या दिवशी आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे.

या योजनेनुसार आता पात्र कुटुंबांना वर्षाला 3 सिलिंडर मोफत मिळणार आहेत.त्यामुळे शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या योजनेमुळे महिलांना वर्गांना मोठा दिलासा मिळणार आहे.
स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा अगदी जवळचा संबंध आहे. महिलांच्या आरोगांच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधनाचा पुरवठा करणे ही आपली जबाबदारी आहे. एलीपीजी गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असा पर्याय मानला जातो. त्यामुळे याचा वापर वापर वाढवला पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे.
Maharashtra Deputy CM and NCP chief Ajit Pawar says, "We will give 3 free cylinders every year to all households under CM Anna Chhatra Yojana of Maharashtra govt."
— ANI (@ANI) June 28, 2024
गॅस सिलिंडर प्रत्येकाला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी जाहीर करत आहे, असं अजित पवार म्हणाले.पुढे बोलताना पवार म्हणाले की, ही योजना पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत ठरेल आणि राज्यातील 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.
दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये सर्वसामान्य नागरिक वाढत्या महागाईमुळे अक्षरशः बेजार झाले होते. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले होते.त्यामुळे शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या या योजनेमुळे महिलांना वर्गांना मोठा दिलासा मिळणार आहे.












Click it and Unblock the Notifications