Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर! म्हाडाच्या 2264 घरांच्या लाॅटरीसाठी अर्ज करण्यास 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Mhada Lottery 2024 : घरांचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज आहे. आता म्हाडाचे घर घेणाऱ्यांची जर संधी हुकली असेल तर अशांना आणखी एक संधी म्हाडाने उपलब्ध करुन दिली आहे. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे 2 हजार 264 सदनिकांच्या विक्रीसाठी जाहीर सोडतीकरिता अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

24 डिसेंबर 2024 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्जदारांना अर्ज सादर करता येणार आहे, अशी माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली आहे. त्यामुळे ज्यांची संधी हुकली अथवा काही कारणांनी अर्ज करता आला नाही अशांना आता अर्ज करता येणार आहे.

Mhada Lottery 2024

24 डिसेंबरला रात्री बाराच्या आत अर्ज करता येणार

कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज भरणा प्रक्रियेला 11 ऑक्टोबर 2024 ला प्रारंभ करण्यात आला. मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीत अर्जदार 24 डिसेंबर 2024 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत सहभाग घेऊ शकतात. त्यानंतर सोडतीत सहभाग घेण्याची लिंक या प्रणालीवरून निष्क्रिय करण्यात येणार आहे. 26 डिसेंबर 2024 रात्री 11.59 पर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील.

https://housing.mhada.gov.in ही आहे अधिकृत वेबसाईट

सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी 8 जानेवारी 2025 ला सायंकाळी सहा वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. 16 जानेवारी 2025 ला सायंकाळी 6 वाजता सोडतीत सहभाग घेणार्‍या अर्जांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

अशी आहेत घरे

या सोडतीत 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 594 सदनिका, 15 टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 825 सदनिका, कोकण मंडळाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत विखुरलेल्या 728 सदनिका, रोहा-रायगड आणि ओरस सिंधुदुर्ग इथं 117 भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

'राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू आचारसंहितेमुळं सोडतीविषयक प्रसार मोहीम राबविता आली नाही. त्यामुळं आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर मंडळातर्फे प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य तत्वावर योजनेतल्या सदनिकांच्या विक्रीला प्रतिसाद वाढावा यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.

या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मंडळानं ठिकठिकाणी उभारलेल्या स्टॉल्सला आतापर्यंत सुमारे 6 हजार लोकांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली आहे. त्यापैकी 301 जणांनी सदनिका खरेदीसाठी विक्री किंमतही जमा केली. 2264 सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज करण्यास अर्जदारांना संधी मिळावी यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे,' या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी केलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+