महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या जूनमधील सोडतीचा निकाल जाहीर ; येथील तिकिटाला 22 लाखांचे बक्षीस
मुंबई : महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या जूनमधील सोडतींचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विविध पाच सोडती काढण्यात आल्या असून अकोला येथील तिकिटाला जलाराम लॉटरीचे 22 लाखांचे बक्षीस जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात 5 मासिक सोडती काढल्या जातात. माहे जून-2024 मध्ये दि. 8 जून 2024 रोजी महाराष्ट्र सह्याद्री, दि. 14 जून 2014 रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी मान्सून विशेष, दि. 19 जून 2024 रोजी महाराष्ट्र गौरव, दि. 21जून 2014 रोजी महाराष्ट्र तेजस्विनी, व दि. 26 जून 2024 रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आल्या आहेत.
कोल्हापूरच्या तिकिटाला 11 लाखांचे बक्षीस
त्यापैकी महाराष्ट्र सह्याद्री मालिका तिकीट क्रमांक MS-2406-A/15221 या श्री.महावीर लॉटरी सेंटर, कोल्हापूर यांच्याकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रू. 11 लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षीस जाहीर झाली आहेत. या सोडतीच्या एकूण 2697 तिकिटांना एकूण रु.17,76,750/- किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत.
अकोल्याच्या तिकिटाला 22 लाख रुपये
महाराष्ट्र गणेशलक्ष्मी मान्सून विशेष तिकीट क्रमांक GS-04/6625 या जलाराम लॉटरी, अकोला यांच्याकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रू. 22 लाखांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे. या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकिटांमधून एकूण 1405 तिकिटांना एकूण रू.29,03,000/- किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत.
महाराष्ट्र गौरव या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकिटांमधून एकूण 6185 तिकिटांना एकूण रु.8,08,500/- किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र तेजस्विनी या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकिटांमधून एकूण 868 तिकिटांना एकूण रु.5,63,200/- किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत.
दादरच्या तिकिटाला 14 लाख
महाराष्ट्र गजराज मालिका तिकीट क्रमांक GJ-01/0959 या श्री. गणेश एंटरप्रायजेस, दादर यांच्याकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रू. 14 लाखांचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षीस जाहीर झाले आहेत. या सोडतीच्या एकूण 2005 तिकिटांना एकूण रू.16,30,000/- किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत.
याशिवाय जून- 2024 मध्ये साप्ताहिक सोडतीतून 36718 जणांना रू. 1,32,88,800/- ची बक्षिसे जाहीर झाली आहेत. सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रू. 10,000/- वरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. 10,000/- च्या आतील बक्षीस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांच्याकडून कळविण्यात आले आहे.
-
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
Bihar next cm : ठरलं! 'हा' नेता होणार बिहारचा नवा मुख्यमंत्री! नितीश कुमार दिल्लीला जाणार.. -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
'धुरंधर-2' चा राडा! पहिल्याच दिवशी 'एवढी' कमाई; 'रणवीर'च्या चित्रपटाचे रेकॉर्डब्रेक ॲडव्हान्स बुकींग -
ऐतिहासिक विजय! भारताचा तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर कब्जा; न्यूझीलंडचा धुव्वा उडवत रचला नवा इतिहास -
T20 World Cup 2026 फायनलमध्ये भारताचा विजय पक्का? किवीविरुद्ध 'हे' 5 शुभ संकेत टीम इंडियाच्या बाजूने -
पुरुषांनो, 'या' 5 सामान्य लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; असू शकतो वाढलेल्या प्रोस्टेटचा धोका! -
इराण-इस्त्रायल युद्धाच्या रणधुमाळीत भारताचे 'मिशन सुरक्षित समुद्र': नौदलाच्या बाबत घेतला मोठा निर्णय -
राष्ट्रपतींच्या बंगाल दौऱ्यावरून रणकंदन; आदिवासी अस्मिता, प्रोटोकॉल अन् मोदी-ममता सरकारमध्ये संघर्ष -
ICAI CA Result 2026: सीए इंटर आणि फाउंडेशन परीक्षेचा निकाल आज! असा बघा निकाल मेरीट लिस्ट -
महिला दिनीच सोन्याचा 'भाव' वाढला! मुंबईत 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार दीड लाखांहून अधिक; पाहा ताजे दर










Click it and Unblock the Notifications