लॉटरीच्या बाबतीत ही गोवा आहे नंबर १

मुंबई: भारताच्या पश्चिम किनार्यावर वसलेले होवा राज्य तिथल्या पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेच, पण त्यासोबतच ते प्रसिद्ध आहे तिथल्या लॉटरीसाठी. गोवा तुम्हाला झटपट श्रीमंत बनण्याची संधी देते. तीही कायदेशीर पद्धतीने. गोव्याची फेणी, गोव्याचे किनारे, इथले पर्यटक यांच्या इतकीच प्रसिद्ध आहे ती इथली लॉटरी.

Goa Lottery

गोवा राज्य लॉटरी संचालनालयची स्थापना २३ फेब्रुवारी १९९५ रोजी झाली. १ एप्रिल २००६ योजी त्याचे विलीनीकरण राष्ट्रीय बचत संघटन मध्ये एका नव्या विभागात करण्यात आले. ज्याचे नाव आहे अल्प बचत आणि लॉटरी संचालनालय.
सध्या गोव्यात लॉटरीच्या रोज 5 सोडती काढल्या जातात. त्यामुळेच दररोज सर्वाधिक सोडती काढणारे गोवा हे भारतातील एकमेव राज्य आहे. रोजच्या सोडतींच्या शिवाय बम्पर ड्रो काढले जातात. ते महत्वाच्या तारखांना आणि दिवाळीसारख्या सणांना काढले जातात.गोव्यात तीन दैनिक लॉटरी काढले जातात, ते ड्रा लाभलक्ष्मी, राजश्री आणि गोल्डन धनलक्ष्मी या नावाने ओळखल्या जातात.

लाभलक्ष्मी लॉटरी

लाभलक्ष्मी लॉटरी चा ड्रा हर रोज केवळ एकदा संध्याकाळी ६ वाजता काढला जातो. तिकिटांची किंमत १० रुपये आहे. प्रत्येक सोडतीसाठी एकूण 3 लाख तिकिटे उपलब्ध असतात.

राजश्री लॉटरी

राजश्री 10 लॉटरी एका दिवसात तीनवेळा काढली जाते. दुपारी २ वाजता, संध्याकाळी ४.४० वाजता आणि रात्री ८ वाजता. तिकीटाची किंमत फक्त ६ रुपये इतकी असते.

गोल्डन वीकली लॉटरी

गोवा सरकारने एप्रिल २०२१ मध्ये गोल्डन वीकली लॉटरी सुरु केली. त्याचे एका दिवसात चार ड्रॉ असतात. दुपारी 2:30 वाजता कुबेर लक्ष्मी ड्रॉ, संध्याकाळी 4 वाजता लक्ष्मी ड्रॉ, संध्याकाळी 5:30 वाजता महालक्ष्मी ड्रॉ आणि संध्याकाळी 7 वाजता बजे धनलक्ष्मी ड्रॉ काढण्यात येतो.

गोल्डन श्रीमाला राशि 50 मासिक लॉटरी

गोल्डन श्रीमाला राशि 50 मासिक लॉटरी ओगस्ट २०२१ मध्ये सुरु करण्यात आली आणि त्यात गोवा राज्यातील सर्वात मोठे बक्षीस ठेवण्यात आले. सोडत प्रत्येक दुसर्या मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता काढण्यात येतो आणि एका तिकीटाची किंमत २० रुपये इतकी आहे. पहिले बक्षीस रु 10 लाख इतके आहे.

सामान्यपणे गोवा भारतात आयोजित करण्यात येणाऱ्या खास दिवशी आणि राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशी एका बम्पर ड्रोचे आयोजन करते. नवे वर्ष आणि होळी अशा सणांना अनेक राज्ये विशेष सोडती काढतात मात्र गोवा राज्य फक्त दिवाळीला बम्पर ड्रो काढते.

२०१९ मध्ये गोवा राज्य राजश्री बम्पर दिवाळी सोडत जिंकणाऱ्या विजेत्याला 5 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. २०२० मध्ये निर्बंधांमुळे ड्रो काढला गेला नाही. पण सध्याच्या घडीला लॉटरीच्या बाबतीत गोवा हे प्रथम क्रमांकाच्या पसंतीचे राज्य आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+