Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Cidco Lottery 2024 : 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' या योजनेला तोबा गर्दी, नोंदणीसाठी पुन्हा मुदतवाढ!

Cidco Mass Housing lottery 2024 : सिडको महामंडळाच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर' या महागृहनिर्माण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा प्रारंभ केल्यापासून अवघ्या 30 दिवसांत 92 हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. या गृहनिर्माण योजनेकरिता अधिकाधिक नागरिकांना अर्ज करता यावा, यासाठी योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणी करीता आता 11 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

कोणाला होणार फायदा!

सिडकोतर्फे 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' या महागृहनिर्माण योजनेचा 11 ऑक्टोबर 2024 रोजी प्रारंभ करण्यात आला. सदर योजनेंतर्गत नवी मुंबईच्या वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये सदनिका मिळणार आहेत.

Cidco Mass Housing lottery 2024

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरिता 26,000 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. अर्जदारांना आपल्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य हे या योजनेचे विशेष वैशिष्ट्य मानले जात आहे.

काय मिळणार या ठिकाणी सुविधा!

परवडणाऱ्या दरासह परिपूर्ण पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हीटी, दर्जेदार बांधकाम आणि नवी मुंबईतील समृद्ध जीवनशैली अनुभवण्याची संधी या गृहनिर्माण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात आली. सिडकोच्या अन्य गृहनिर्माण योजनांप्रमाणेच या गृहनिर्माण योजनेसही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभून आजपर्यंत 92 हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.

11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

योजनेकरिता अधिकाधिक नागरिकांना अर्ज करता येऊन त्यांचे घराचे स्वप्न साकार व्हावे याकरिता योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस 11 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज नोंदणीस मुदतवाढ देण्यात आल्याने अर्जदारांना उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र इ. आवश्यक त्या कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठीही पुरेसा अवधी मिळणार आहे.

कशी करणार ऑनलाईन नोंदणी?

ऑनलाइन नोंदणी करताना बारकोड असलेले प्रमाणपत्र सादर करण्याची अटही शिथिल करण्यात आली आहे. ऑनलाइन नोंदणी करताना बारकोड नसलेले रहिवास प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे; परंतु वाटपपत्र देण्यापूर्वी बारकोड असलेले रहिवास प्रमाणपत्र सादर करणे अर्जदारांना अनिवार्य असणार आहे. तसेच रु. 100/- किंवा रु. 500/- मूल्याच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र/वचनपत्र सादर करण्याची अटही शिथिल करण्यात आली आहे. अर्जदारांना कोऱ्या कागदावर स्वसाक्षांकित शपथपत्र/वचनपत्र सादर करता येणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+