कोण आहे सौदी अरेबियाचा 'स्लीपिंग प्रिन्स'?, 20 वर्षांपासून का झोपलेला आहे, जाणून घ्या संपूर्ण कहाणी
Saudi Arabia Sleeping Prince Al-Waleed bin Khaled bin Talal : सौदी अरेबियातील एक महत्त्वाची व अनोखी बातमी समोर आली आहे. सौदी अरेबियाचे राजकुमार गेल्या 20 वर्षांपासून झोपलेले आहेत. विशेष म्हणजे नुकताच त्यांचा 36 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. नेमकं त्यांना काय झालंय, ज्यामुळे त्यांना 'स्लीपिंग प्रिन्स' असे म्हटले जाऊ लागले आहे. या संपूर्ण कहाणीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
सौदी अरेबियाचे प्रिन्स अल-वलीद बिन खालिद बिन तलाल हे 36 वर्षांचे झाले आहेत. त्यांनी नुकताच 36 वा वाढदिवस साजरा केला आहे. प्रिन्सचा वाढदिवस साजरा परंतु त्यांना अजिबात कळले देखील नाही. कारण, ते कोमात आहेत. मुळात काही वर्षांपूर्वी त्यांचा अपघात झाला, त्यात ते गंभीर जखमी झाले. मेंदूच्या भागाला मार लागल्यापासून ते बेशुद्ध अवस्थेत आहेत. तेव्हापासून ते कोमात गेलेले आहेत.

(फोटो सोर्स- https://x.com/YousafK53695321/status/1914546805766828084)
सौदी अरेबियातील काही माध्यमांच्या अहवालानुसार, 2005 मध्ये एका रस्ते अपघातात प्रिन्स अल-वलीद बिन खालिद बिन तलाल यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. तेव्हापासून ते कोमात होते, रियाधमधील किंग अब्दुल अजीज मेडिकल सिटीमध्ये मशीनद्वारे त्यांना जीवंत ठेवण्यात आलेले आहे.
कोण आहे 'स्लीपिंग प्रिन्स'?
सौदी राजघराण्यातील सदस्य असलेले प्रिन्स अल-वलीद बिन खालिद बिन तलाल यांना त्यांच्या दीर्घकाळ कोमामुळे "स्लीपिंग प्रिन्स" म्हणून संबोधले जाते. ते आधुनिक सौदी अरेबियाचे संस्थापक राजा अब्दुल अजीज यांचे पणतू आणि प्रिन्स तलाल बिन अब्दुल अजीज यांचे नातू आहे. सद्याच्या राजाशी त्यांचा थेट संबंध नसला तरी, सलमान बिन अब्दुल अझीझ हे त्यांचे पणजोबा आहेत.
अपघातानंतर, डॉक्टरांनी लाईफ सपोर्ट बंद करण्याचा सल्ला दिला होता. परंतु, तरी देखील प्रिन्स अल-वलीद यांचे वडील, प्रिन्स खालेद बिन तलाल अल सौद यांनी त्याला नकार दिला. त्यांना आशा आहे की, त्यांचा मुलगा बरा होईल. वडिलांनी सांगितले की जर देवाला त्याला अपघातात मारायचे असते तर तो आतापर्यंत संपला असता. प्रिन्सच्या वडिलांनी मुलाच्या काळजी घेण्याचा निर्धार केला.
20 वर्षांपासून शुद्धीवर आलेले नाही
2019 च्या सुरुवातीला काही माध्यमांमध्ये असे वृत्त आले की, प्रिन्स अल-वालिद यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. ते बोट वर करणे किंवा डोके फिरवणे यासारख्या किरकोळ करत असल्याची सांगितले गेले. परंतु ते पूर्णपणे शुद्धीवर आलेच नाही. 18 एप्रिल रोजी त्यांचा नुकताच 36 वा वाढदिवस साजरा झाला. त्यांच्या प्रकृतीची पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. लोकांनी राजकुमारचे फोटो शेअर केले आहेत.












Click it and Unblock the Notifications