Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

UNGAमध्ये पाकड्यांच्या इज्जतीचे वाभाडे काढणारी भारतीय युवा राजदूत पेटल गेहलोतविषयी वाचा सविस्तर!

Who Is Petal Gahlot : पेटल गहलोत हे नाव आज आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचे धाडस आणि आत्मविश्वास दर्शवणारे एक तरुण प्रतीक बनले आहे. त्याचे कारण, देखील अगदी तसेच आहे.

न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (UNGA) जेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दहशतवादावर "निरर्थक नाटक" करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना त्वरित आणि कठोर उत्तर देणारा तरुण आवाज पेटल गहलोत यांचा होता.

भारतीय परराष्ट्र सेवेतील या पहिल्या सचिव एका रात्रीत चर्चेचा विषय बनल्या, कारण त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानला त्याच्या जागी आणून भारताची बाजू ठामपणे मांडली. पाकिस्तानची खरडपट्टी करत त्यांनी पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली. एवढेच नव्हे तर पार पाकिस्तानच्या इज्जतीचे वाबाडे आंतरराष्ट्रीय स्तरावर काढले.

Who is Petal Gehlo

UN मधील भारताची धारदार बाजू: दहशतवादावर थेट प्रहार

पेटल गहलोत सध्या न्यू यॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनमध्ये कार्यरत आहेत. शांतता, सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यांसारख्या प्रमुख जागतिक मुद्द्यांवर भारताच्या हितांचे जोरदार प्रतिनिधित्व करणे हे त्यांचे प्रमुख काम आहे.

पाकिस्तानची पोलखोल!

UNGA मध्ये त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि थेट भूमिका घेत पाकिस्तानवर दहशतवादी छावण्या त्वरित बंद करण्यासाठी दबाव आणला. पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली. सभेत बोलताना त्यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडून पाकिस्तानला चूप केले.

दहशतवाद्यांच्या स्वाधीनतेची मागणी

भारतातील 'मोस्ट वॉन्टेड' दहशतवाद्यांना भारताच्या स्वाधीन करण्याची मागणी त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावरून केली, ज्यामुळे भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेला अधिक बळ मिळाले.

युवा नेतृत्वाचा चेहरा

गहलोत या तरुण भारतीय राजदूतांच्या नवीन पिढीचा चेहरा आहेत. त्या धाडस, ज्ञान आणि आधुनिक विचारसरणीचा समन्वय साधून जगासमोर भारताचे प्रतिनिधित्व करतात.

मजबूत शैक्षणिक पाया अन् समृद्ध अनुभव

नवी दिल्लीत जन्मलेल्या पेटल गहलोत यांचा प्रवास मुंबई आणि दिल्ली विद्यापीठातून संयुक्त राष्ट्रांपर्यंत पोहोचला आहे, ज्याचा पाया उत्कृष्ट शिक्षणाने रचला गेला आहे. त्यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली.

२०१५ मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या प्रतिष्ठित लेडी श्री राम कॉलेज (LSR) मधून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी (MA) पूर्ण केली. २०१५ मध्येच त्यांच्या या भक्कम शैक्षणिक आधारावर त्यांची भारतीय परराष्ट्र सेवेसाठी (IFS) निवड झाली.

आंतरराष्ट्रीय पोस्टिंग

संयुक्त राष्ट्रांमध्ये मोठी जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी, त्यांनी पॅरिसमधील भारतीय दूतावास आणि सॅन फ्रान्सिस्कोमधील वाणिज्य दूतावास अशा महत्त्वाच्या परदेशी पोस्टिंगमध्ये काम करून आपला अनुभव समृद्ध केला आहे. याच अनुभवामुळे आणि क्षमतेमुळे त्यांना UN मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.

फाईल आणि फाईन आर्ट्सचा संगम, संगीताची आवड!

पेटल गहलोत केवळ एक कुशल आणि कठोर प्रशासक नाहीत, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला कला आणि संगीताची एक सर्जनशील बाजू आहे, जी त्यांना इतर अधिकाऱ्यांपेक्षा वेगळी ठरवते. राजदूतत्वाच्या गंभीर वातावरणापासून दूर, त्यांना गिटार वाजवणे आणि गाणी गाणे आवडते. डीयू पदवीधर असूनही, त्यांची ही कलात्मक आवड त्यांची बहुगुणी प्रतिभा दर्शवते.

'बेला सियाओ'ची ख्याती

त्यांच्या संगीतावरील प्रेमाचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचे प्रसिद्ध इटालियन गाणे "बेला सियाओ" चे कव्हर व्हर्जन, जे सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाले.

पेटल गहलोत हे सिद्ध करतात की भारतातील नवीन राजदूत केवळ कठोर धोरणे आणि राजकारणातच नव्हे, तर कला आणि संस्कृतीतही अतुलनीय प्रतिभा घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+