हिंदूंविरुद्ध भडकवणारे पाकिस्तानी जनरल असीम मुनीर कोण जाणून घ्या! भारत-हिंदुविरोधी आहे ओळख
who is Pakistani General Asim Munir : सय्यद असीम मुनीर अहमद शहा भारतविरोधी वक्तव्यासाठी कुप्रसिद्ध आहे. त्यांनी अलिकडेच भारत आणि हिंदुबद्दल भडकाऊ भाषण केले होते. याशिवाय काश्मीर आमच्या गळ्याची रक्तवाहिनी आहे असेही म्हटले होते. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे पहलगाम हल्ल्याला बळ मिळाले का? आता यावर चर्चा होत आहे.
पाकिस्तानी राजकारणातही हस्तक्षेप असो की, बलुचिस्तान प्रांतासाठी लढणे असो अथवा परराष्ट्र धोरण असो यामध्ये सय्यद असीम मुनीर यांचा काही न् काही संबंध येतोच इम्रानखान यांना अटक झाल्यानंतर रंगलेले शाब्दीक युद्ध असो..या सर्व पार्श्वभुमीवर आता पहलगाम हल्ल्यानंतर पुन्हा सय्यद असीम मुनीर यांची चर्चा होत आहे. कोण आहेत पाकिस्तानी आर्मी चिफ त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

जनरल मुनीर यांचे काश्मीरबद्दल वक्तव्य
काश्मीरबद्दल बोलताना जनरल मुनीर म्हणाले, "आमची भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे, काश्मीर आमच्या गळ्याची रक्तवाहिनी आहे असे म्हणत त्यांनी काश्मीरी जनतेला कुरवाळणे सुरु केलेले आहे. तसे पाहता पाकिस्तानच्या काश्मीरबाबतच्या भुमिकेला त्यांनी आधीच बळ दिलेले आहे.
पाकिस्तानी लष्करप्रमुखांच्या वक्तव्यामुळे दहशतवादी हल्ला झाला का?
जनरल मुनीर यांनी अलिकडे जी वक्तव्यं केली. त्यामुळे टीआरएफला या हल्ल्यासाठी बळ मिळाले असे अनेक गुप्तचर अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे टाईम्स ऑफ इंडियाच्या वृतात म्हटले आहे.
कोण आहे सय्यद असीम मुनीर?
रिपोर्टनुसार, सय्यद असीम मुनीर यांचा जन्म रावळपिंडी, पाकिस्तान येथे एका पंजाबी मुस्लिम सय्यद कुटुंबात झाला. त्यांचे मूळ जालंधर, पंजाब, भारत येथे आहे, तेथून त्यांचे पालक 1947 च्या भारताच्या फाळणीनंतर स्थलांतरित झाले. ढेरी हसनाबाद, रावळपिंडी येथे स्थायिक होण्यापूर्वी ते टोबा टेक सिंग येथे गेले.
धार्मिक शिक्षण घेतले, क्रिकेटपटूही होते
मुनीर यांनी आपले सुरुवातीचे धार्मिक शिक्षण मरकाझी मदरसा दार-उल-ताजवीद, रावळपिंडी येथील पारंपारिक इस्लामिक मदरसा येथे घेतले. ते त्यांच्या तारुण्यात स्थानिक क्रिकेटपटू देखील होते तसेच ते वेगवान गोलंदाजी करायचे. मुनीर यांनी फुजी स्कूल, जपान, कमांड अँड स्टाफ कॉलेज, क्वेटा, मलेशियन आर्म्ड फोर्सेस कॉलेज, क्वालालंपूर आणि नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटी, इस्लामाबाद येथून पदवी प्राप्त केली आहे.
लष्करात दाखल
मुनीर यांची फ्रंटियर फोर्स रेजिमेंटच्या 23 व्या बटालियनमध्ये त्यांची नियुक्ती झाली. 25 एप्रिल 1986 रोजी त्यांनी लष्करी कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर लेफ्टनंट कर्नल म्हणून नंतर ब्रिगेडियर म्हणून, मग मेजर जनरल पदावर बढती देण्यात आली. मुनीर यांना सप्टेंबर 2018 मध्ये लेफ्टनंट जनरल पदावर बढती देण्यात आली आणि त्यानंतर त्यांची आयएसआय डीजी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
2022 पासून पाकिस्तानचे बनले लष्करप्रमुख
मुनीर हे 27 नोव्हेंबर 2022 रोजी निवृत्त होणार होते. लष्करप्रमुख (COAS) म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी, त्यांनी त्यांचा निवृत्ती अर्ज सादर केला होता जो नंतर संरक्षण मंत्रालयाने नाकारला आणि सरकारने त्यांना सेवेत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. मुनीर हे धर्माच्या बाबतीत तो पुराणमतवादी मानला जातात. "पाकिस्तान प्रथम" हे धोरण आहे.












Click it and Unblock the Notifications