Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

17 वर्षांच्या विद्यार्थ्याला करायचा होता डोनाल्ड ट्रम्पचा खून, आईबापालाही मारले, कोण आहे आरोपी?

जगातील सर्वात शक्तीशाली समजल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्लॅन उघड झाला आहे. यापूर्वीही निवडणूक प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दोनदा हल्ला झाला होता. आता पुन्हा एकदा ट्रम्प यांच्या हत्येचा कट पोलिसांनी उघड केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पकडलेला आरोपी हा फक्त १७ वर्षांचा अल्पवयीन मुलगा आहे. ट्रम्प यांच्या हत्येच्या कटासाठी या आरोपीने आपल्या आईवडीलांचीही हत्या केल्याचे तपासात समोर आले.

Who is Nikita Kasap

नेमका काय होता प्लॅन?

अमेरिकेतली काही वृत्तसंस्थानी बातम्यानुसार, गेल्या महिन्यांत तातियाना कॅसॅप व डोनाल्ड मेयर यांची हत्या झाली होती. या हत्येचा तपास करताना काऊंटी अधिकाऱ्यांनी निकिता कॅसॅप या १७ वर्षिय मुलाला अटक केली. निकिता हा तातियाना यांचा मुलगा आहे. डोनाल्ड मेयर हे निकिताचे सावत्र वडील आहेत. निकिताची चौकशी केल्यावर तो नाझी समर्थक असल्याचे उघड झाले. त्याला अमेरिकेत मोठा बदल घडवून आणायचा होता.

दोन मृतहेदानंतर उकल

तातियाना कॅसॅप (वय ३५) व डोनाल्ड मेयर (वय ५१) या पतीपत्नीचे मृतहेद कुजलेल्या अवस्थेत सापडले. त्यांच्या दातांच्या नमुन्यावरुन त्यांची ओळख पटविण्यात आली. ही हत्या ११ फेब्रुवारीलाच झाल्याचे उघड झाले. या हत्यांचा तपास करत असताना संशयाची सुई या दाम्पत्याचा मुलगा निकितावर आली. निकिता कॅसॅप हा हत्येनंतर दोन आठवडे शाळेत गेला नव्हता. पोलिसांनी त्याला पकडल्यावर सर्व गोष्टी उघड झाल्या.

कोण आहे निकिता कॅसॅप?

निकिता कॅसॅप हा १७ वर्षांचा आहे. तो हायस्कूलचा विद्यार्थी आहे. त्याने त्याच्या आईवडिलांची हत्या केली. त्यानंतर १४ हजार डाॅलर रोख पैसे व पासपोर्ट घेऊन तो पळाला. त्याच्याकडे नाझी समर्थन करणारे साहित्य सापडले. त्याला नाझीच्या हिंसक क्रांतीची सुरुवात करायची होती. त्यासाठी त्याला डोनाल्ड ट्रम्प यांची हत्याही करायची होती. अमेरिकेतली सरकार उलथवून टाकण्याचा त्याचा प्लॅन होता. त्याच्याकडील कागदपत्रांवरुन हे सगळे स्पष्ट झाले.

पैशासाठी केली हत्या

निकिता कॅसॅप हा अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यातील आहे. त्याच्या पालकांची हत्या केल्याचा आरोप आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करण्यासाठी आणि सरकार उलथवून टाकण्यासाठी त्याला पैसे हवे होते. त्यासाठी त्याने त्याच्या पालकांची हत्या केली, असा आरोप पोलिसांनी लावलाय. निकितावर यापूर्वीही आठ गुन्ह्यांची नोंद आहे. संघीय अधिकाऱ्यांनी कॅस्पवर त्याच्या पालकांच्या हत्येची योजना आखल्याचा, ड्रोन आणि स्फोटके खरेदी केल्याचा आणि त्याच्या योजना इतरांसोबत शेअर केल्याचा आरोप केला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+