Mark Carney कोण आहेत, जे ट्रुडो यांच्या जागी कॅनडाचे PM होणार; जाणून घ्या त्यांच्याविषयी सर्व काही
Who is Mark Carney : मार्क कार्नी हे कॅनडाचे पुढचे पंतप्रधान असतील. ते जस्टिन ट्रुडो यांची जागा घेतील. रविवारी रात्री उशिरा लिबरल पक्षाने त्यांची नेतेपदी निवड केली. कार्नी यांना 85.9% मते मिळाली.
मार्क कार्नी आता कॅनडाचे पंतप्रधान म्हणून जस्टिन ट्रुडो यांची जागा घेतील. विशेष म्हणजे कार्नी यांना यापूर्वी कधीही राजकारणाचा अनुभव नाही. ना ते कोणत्याही पक्षासोबत काम करत होते. पण ते अर्थशास्त्र आणि बँकिंग क्षेत्रातील एक मोठे नाव आहे. ते कॅनडाचे पंतप्रधान होणार आहेत.
दुसरीकडे, रविवारी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कार्नी यांनी माजी अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड, माजी सरकारी सभागृह नेत्या करीना गोल्ड आणि माजी संसद सदस्य फ्रँक बेलिस यांचा पराभव केला. ते कॅनेडियन पंतप्रधानांपैकी पहिले असतील ज्यांना कोणताही कायदेमंडळ किंवा मंत्रिमंडळाचा अनुभव नसणार आहे.
चला तर कॅनडाच्या नवीन पंतप्रधानाविषयी जाणून घेऊया, ते नेमके कोण आहेत, त्यांची कौटुंबिक स्थिती काय तसेच त्यांच्याकडे किती संपत्ती आहे...!

मार्क कार्नी कोण आहे? Who is Mark Carney
- मार्क कार्नी यांचा जन्म 1965 मध्ये कॅनडातील फोर्ट स्मिथ येथे झाला आणि त्यांचे बालपण अल्बर्टातील एडमंटन येथे गेले. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली आणि नंतर ऑक्सफर्डमधून पदव्युत्तर आणि पीएचडी पूर्ण केली. ते आर्थिक क्षेत्रातील एक मोठे नाव आहे.
- त्यांनी 2008 ते 2013 पर्यंत बँक ऑफ कॅनडाचे नेतृत्व केले आणि त्यानंतर 2013 ते 2020 पर्यंत बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होते. विशेष म्हणजे ते बँक ऑफ इंग्लंडचे पहिले बिगर-ब्रिटिश गव्हर्नर बनले.
- 2008 च्या जागतिक आर्थिक संकटादरम्यान कॅनेडियन अर्थव्यवस्थेला हाताळण्याचे श्रेय कार्नी यांना जाते. 2020 मध्ये, त्यांनी हवामान वित्तपुरवठ्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या विशेष दूत म्हणूनही काम केले.
Mark Carney Net Worth मार्क कार्नीची एकूण संपत्ती किती आहे?
- मार्क कार्नी हे खूप श्रीमंत व्यक्ती आहे. अहवालांनुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे $6.97 दशलक्ष (सुमारे 58 कोटी रुपये) असल्याचा अंदाज आहे.
- त्यांनी गोल्डमन सॅक्समध्ये 13 वर्षे काम केले आणि अनेक उच्च पदांवर काम केले. त्यांनी ब्रुकफील्ड अॅसेट मॅनेजमेंटमध्ये वरिष्ठ पदांवर काम केले आहे आणि ब्लूमबर्ग एलपीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे.
मार्क कार्नी यांच्या कुटुंबात कोण-कोण आहे?
- मार्क कार्नी यांची पत्नी डायना फॉक्स या देखील एक अर्थतज्ज्ञ आहेत. ऑक्सफर्डमध्ये शिकत असताना त्यांची भेट झाली आणि 1994 मध्ये त्यांनी लग्न केले.
- त्यांना चार मुली आहेत. त्यांची एक मुलगी, क्लियो कार्नी, हार्वर्ड विद्यापीठात शिकत आहे तसेच हवामान बदलाशी संबंधित एका संस्थेत काम करते.
- उर्वरित तीन मुली सोफिया, अमेलिया, टेस कार्नी मीडियापासून दूर राहतात. त्यांचे कुटुंब प्रथम टोरंटोमध्ये राहत होते, नंतर लंडनला गेले आणि आता ते ओटावामध्ये स्थायिक झाले आहेत.
मावळते पंतप्रधान ट्रुडो काय म्हणाले?
याआधी, मावळते पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पक्ष आणि त्यांच्या समर्थकांना संबोधित केले. ते म्हणाले की- मला चुकीचे समजू नका, गेल्या 10 वर्षात आपण जे काही केले आहे त्याचा मला खूप अभिमान आहे, पण आजची रात्र एक पक्ष म्हणून, एक देश म्हणून आपल्या भविष्याबद्दल आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications