बलुचिस्तानमधील पहिल्या हिंदू महिला असिस्टंट कमिश्नर कशिश चौधरी कोण आहेत?
Who is Kashish Chaudhary? हिंदू कन्या कशिश चौधरीने पाकिस्तानमध्ये इतिहास रचला आहे. २५ वर्षीय कशिश चौधरी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताच्या सहाय्यक आयुक्त बनल्या आहेत. त्या पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू समुदायातील पहिल्या हिंदू महिला आहेत ज्या बलुचिस्तानच्या सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्त झाल्या आहेत. पाकिस्तानच्या अशांत प्रांत बलुचिस्तानच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्त झाल्यानंतर कशिश चौधरी या चर्चेत आहेत.

बलुचिस्तानच्या सहाय्यक आयुक्त पद भूषवणाऱ्या कशिश चौधरी यांचे व्हिडिओ समोर आले आहेत आणि लोक त्यांच्यावर आनंदाने कमेंट करत आहेत. याचे कारण असे की, भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव असताना पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू समुदायातील कशिश चौधरी यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
एवढेच नाही तर बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळे होण्यासाठी त्याच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे. पाकिस्तानी भूमीवर इतिहास रचणारी हिंदू मुलगी कशिश चौधरी कोण आहेत ते जाणून घ्या?
कशिश चौधरी कोण आहे?
कशिश चौधरी या चगाई जिल्ह्यातील एका दुर्गम शहरातून येतात. त्यांचे वडील गिरधारीलाल एक व्यापारी आहेत. २५ वर्षीय कशिश चौधरीने बलुचिस्तान लोकसेवा आयोग (BPSC) परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि आता त्यांची बलुचिस्तानच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.
कशिश चौधरी यांची साधी शैली
सहाय्यक आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर, कशिश चौधरी तिचे वडील गिरधारी लाल यांच्यासोबत बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांना भेटण्यासाठी क्वेटा येथे पोहोचल्या होत्या. या बैठकीच्या समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये, कशिश चौधरी साध्या शैलीत पांढरा सलवार कुर्ता आणि डोक्यावर दुपट्टा परिधान करताना दिसत आहे.
बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांनी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला
बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी सहाय्यक आयुक्त कशिश चौधरी यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. सीएम बुगती म्हणाले की, "अल्पसंख्याक समुदायातील लोक समर्पण आणि कठोर परिश्रमाने अशा पदांवर पोहोचले आहेत हे वेगळेपण आहे." ते म्हणाले की, कशिश या पाकिस्तान आणि बलुचिस्तानसाठी अभिमानाचे प्रतीक आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर कशिश चौधरी काय म्हणाल्या?
सहाय्यक आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कशिश चौधरी म्हणाल्या, "शिस्त, कठोर परिश्रम आणि समाजासाठी योगदान देण्याची इच्छा यामुळे मी या प्रवासात टिकून राहिले आहे." महिला आणि अल्पसंख्याक समुदायासाठी काम करेल अस चौधरी म्हणाल्या.
कशिश चौधरीचे वडिला काय म्हणाले?
कशिश चौधरीचे वडील गिरधारी लाल म्हणाले की, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. माझी मुलगी तिच्या मेहनतीमुळे असिस्टंट कमिशनर झाली आहे. ते म्हणाले, माझ्या मुलीला नेहमीच शिक्षण घ्यायचे होते आणि महिलांच्या जीवनात बदल घडवून आणायचा होता.












Click it and Unblock the Notifications