Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारतात जसे आधार कार्ड महत्वाचे तसे पाकिस्तानमध्ये कोणतं कार्ड महत्वाचं, घ्या जाणून

भारतात आधार कार्ड हा एक अतिशय महत्त्वाचा डॉक्यूमेंट मानला जातो आहे. प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.आधार कार्ड हे भारतीयांचे महत्वाचे ओळखपत्र आहे. आधार कार्डवर नाव, पत्ता आणि अस्तित्वाची पुष्टी करते.

ज्याप्रमाणे भारतात आधार कार्ड महत्वाचं डॉक्यूमेंट मानला जाते, त्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये डॉक्यूमेंट कशाला मान्यता आहे. तिथे लोक महत्वाचे डॉक्यूमेंट काय वापरतात याबद्दल नागरिकांना उत्सुकता आहे. तुम्हाला माहिती आहे का पाकिस्तानमध्ये कोणत्या ओळखपत्रला महत्वाचा ओळखीचा पुरावा मानला जातो.? तर चल मग सविस्तर जाणून घेऊया.

aadhar card on pak nadracard

भारतात आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकाच्या ओळखीचा आधार आहे, त्याचप्रमाणे पाकिस्तानमध्ये नाद्रा कार्ड हे पाकिस्तानी नागरिकांची ओळख सुनिश्चित करते. NADRA म्हणजे राष्ट्रीय डेटाबेस आणि नोंदणी प्राधिकरण आहे. जी पाकिस्तानमधील नागरिकांचा डेटा हाताळणारी एक सरकारी संस्था आहे. NADRA चे पूर्ण रूप राष्ट्रीय डेटाबेस आणि नोंदणी प्राधिकरण असे आहे. ही संस्था 2000 मध्ये स्थापन झाली करण्यात आली होती. या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पाकिस्तानी नागरिकांचा एक केंद्रीकृत डेटाबेस तयार करणे आहे, ज्यामध्ये त्यांची संपूर्ण माहिती सुरक्षित ठेवली जाते.

पाकिस्तानमध्ये NADRA कार्ड आहे महत्वाचे डॉक्यूमेंट

पाकिस्तानमध्ये NADRA कार्डला अधिकृतपणे Computerized National Identity Card (CNIC) असे म्हणतात. हे एक राष्ट्रीय ओळखपत्र आहे. ज्याप्रमाणे भारताच्या आधार कार्डमध्ये 12 यूनिक अंक असतात. त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या राष्ट्रीय ओळखपत्रात 13 युनिक क्रमांक आहेत. हे कार्ड बनवण्यासाठी, आधारप्रमाणेच, व्यक्तीचे फिंगरप्रिंट आणि आय स्कॅन सारखे बायोमेट्रिक्स वापरले जातात. आधार कार्ड आणि नाद्रा कार्डमध्ये फक्त एक छोटासा फरक आहे. पाकिस्तानमध्ये NADRA कार्ड मिळविण्यासाठी, कोणत्याही नागरिकाचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे तर भारतात 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलासाठी देखील आधार कार्ड बनवता येते.

पाकिस्तानमध्ये मतदान, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि बँक खाते उघडणे यासारख्या कामांसाठी NADRA कार्ड आवश्यक आहे. भारताचे आधार पाकिस्तानच्या NADRA कार्डच्या पेक्षा जास्त ऍडव्हान्स आहे. भारताच्या आधार्ड कार्डवर कोणत्याही नागरिकांची संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर माहिती होते. जसे की, त्याच्या बँक खात्यापासून ते पॅन कार्डपर्यंतची माहिती आणि त्या व्यक्तीने घेतलेल्या योजनांची माहिती देखील आधार कार्डवरून जाणून घेता येते. भारत सरकारने आधार अनिवार्य केले आहे. तुम्हाला बँक खाते उघडायचे असेल, कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल किंवा इतर कोणतेही महत्त्वाचे ठिकाणी काही सरकारी काम करायचे असेल, आधार प्रत्येक गोष्टीसाठी आवश्यक आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+