Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

व्लादिमीर पुतिन यांच्या 10 वर्षीय मुलाचा गुप्त फोटो पहिल्यांदा जगासमोर

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मुलाचा फोटो पहिल्यांदाच जगासमोर समोर आले आहेत, यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, या फोटोमध्ये 10 वर्षीय इव्हान व्लादिमीरोविच पुतिन याला दाखवण्यात आलं आहे. ज्याला पुतिन आणि ऑलिम्पिक जिम्नॅस्ट अ‍ॅलिना कबायेवा यांचा मुलगा असल्याचे सांगितले जाते.

रशियन कायदा अंमलबजावणी आणि गुप्तचर संस्थांशी कथित संबंध असलेल्या एका प्रमुख क्रेमलिनविरोधी टेलिग्राम चॅनेलने व्लादिमीर पुतिन यांचा मुलगा इवान याचा पहिला सार्वजनिक फोटो प्रसिद्ध केल्याचा दावा डेली मेलने केला आहे. पुतिन यांनी आपले वैयक्तिक आयुष्य नेहमीच गुप्त ठेवले आहे, परंतु या लीकमुळे त्यांच्या गुप्त कुटुंबाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

vladimir putin

लीक झालेली फोटो आणि टेलिग्राम चॅनल

VChK-OGPU या टेलिग्राम चॅनलने 22 एप्रिल 2025 रोजी इव्हान व्लादिमीरोविच पुतिन याची दोन फोटो प्रसिद्ध केली. मिडिया रिपोर्टनुसार, या चॅनलने दावा केला की, "हा रशियातील सर्वात गुप्त आणि कदाचित सर्वात एकाकी मुलगा आहे." इव्हान हा पुतिन आणि त्यांच्या दीर्घकालीन मैत्रीण ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती जिम्नॅस्ट अ‍ॅलिना कबायेवा यांचा मुलगा असल्याचे सांगितले जाते. हे फोटो प्रथमच सार्वजनिक झाली असून इवानचा चेहरा पुतिनसारखा दिसतो.

या चॅनलने सांगितले की, इव्हानला सर्वसामान्य रशियन लोकांपासून गुप्त ठेवण्यात आले आहे. त्याला सामान्य मुलांप्रमाणे शाळेत पाठवले जात नाही तर पुतिन यांच्या राजवाड्यांमध्ये त्याचे शिक्षण होते. त्याच्या आजूबाजूला नेहमी सुरक्षारक्षक, गव्हर्नेस आणि शिक्षक असतात, ज्यामुळे तो इतर मुलांशी फारसा संपर्क साधू शकत नाही. या फोटोंमुळे पुतिन यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, कारण त्यांनी कधीही कबायेवा आणि त्यांच्या मुलांना सार्वजनिकपणे स्वीकारले नाही.


अलिना या रशियाची एक प्रसिद्ध महिला आहेत

अलिना आणि पुतिन यांच्यातील अफेअरच्या अफवा वेळोवेळी समोर आल्या आहेत. जिम्नॅस्टिक्स खेळातून निवृत्त झाल्यानंतर अलिना राजकारणात सहभागी झाली. एवढेच नाही तर अलिना पुतिन यांच्या युनायटेड रशिया पक्षाकडून खासदार बनली. अलिनानेही गायिका बनण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ती यशस्वी होऊ शकली नाही. 2007 ते 2014 पर्यंत अलिना रशियन संसदेच्या कनिष्ठ सभागृह, स्टेट ड्यूमाच्या डेप्युटी होत्या. याशिवाय, सप्टेंबर 2014 मध्ये त्यांची रशियाच्या राष्ट्रीय मीडिया ग्रुपच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.

इव्हान आणि त्याचे एकाकी जीवन

इव्हान व्लादिमीरोविच पुतिन हे 10 वर्षांचा असून त्याला एक धाकटा भाऊ आहे, ज्याचे नाव व्लादिमीर ज्युनियर आहे, जो चार वर्षांचा आहे. मिडिया रिपोर्टनुसार, इव्हान आणि त्याचा भाऊ पुतिन यांच्या वाल्डाई येथील विशाल राजवाड्यात राहतात, जे मॉस्कोच्या उत्तरेला जंगल आणि तलावांनी वेढलेले आहे. या मुलांना सर्व प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध आहेत, परंतु त्यांचे जीवन अत्यंत एकाकी आहे. ते आर्मर्ड ट्रेन, खासगी जेट आणि यॉट्समधून प्रवास करतात, आणि रशियाच्या फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिसद्वारे त्यांच्यावर सतत लक्ष ठेवले जाते.

VChK-OGPU च्या मते, इव्हान "रशियातील सर्वात एकाकी मुलगा" आहे, कारण तो इतर मुलांशी फारसा संवाद साधत नाही. त्याच्या आयुष्यातील सर्व वेळ सुरक्षारक्षक, गव्हर्नेस आणि शिक्षकांसोबतच जातो. त्याला सामान्य मुलांप्रमाणे खेळण्याची किंवा मित्र बनवण्याची संधी मिळत नाही. त्याचे शिक्षण पुतिन यांच्या राजवाड्यांमध्येच होते, जिथे त्याला रशियन झारच्या शाही मुलांप्रमाणे वागवले जाते.

पुतिन यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून दोन मुली

व्लादिमीर पुतिन यांनी 1983 मध्ये ल्युडमिलाशी लग्न केले. पुतिन यांनी 2013 मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नी ल्युडमिला अलेक्सांद्रोव्हना ओचेरेटनाया यांच्याशी घटस्फोट घेतला होता. त्यांच्या मुलींची नावे मारिया आणि कतरिना आहेत. मात्र, त्यानंतर पुतिन यांनी अद्याप लग्न केलेले नाही.

व्लादिमीर पुतिन यांची मोठी मुलगी डॉ. मारिया व्होरोंत्सोवा क्रेमलिनमध्ये म्हणजेच रशियन राष्ट्रपती राजवाड्यात काम करते. तथापि, अधिकृतपणे ते रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन केंद्राच्या एंडोक्राइनोलॉजी विभागाचे मुख्य संशोधक आहेत.

छोट्या मुलीच्या नावावर अब्जावधींची मालमत्ता

पुतिन यांची छोटी मुलगी कतरिना तिखोनोवा देखील क्रेमलिनमध्ये काम करते. ती संरक्षण विभागात तंत्रज्ञानाच्या सहाय्याच्या कामाची देखरेख करते. कतरिनाने 2015 मध्ये रशियाच्या क्रिल शामलोवीशी लग्न केले. व्हाईट हाऊसच्या मते, कतरिनाची 15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. तिचा पती देखील शामलोवी रशियन बँकेत भागधारक आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+