'ट्रम्पला मारा अन् भारतावर अणुबॉम्ब टाका', अमेरिकेतून थेट धमकी!, भारताला कोण करू पाहतेय उद्ध्वस्त?
Drop nuclear bomb on India message : बुधवारी अमेरिकेच्या मिनियापोलिस शहरातील एका चर्चमध्ये शाळकरी मुलांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला असून, गोळीबार करणाऱ्याच्या बंदुकांवर लिहिलेले काही संदेश अधिकच चिंता वाढवणारे आहेत. यावर भारताला एक प्रकारे इशारा देण्यात आलेला आहे. चला तर नेमकं काय म्हटलं अन् कोण भारताला उद्धवस्त करू पाहत आहे. या संपूर्ण प्रकरणाविषयी जाणून घेऊया.
'भारतावर अणुबॉम्ब टाका'
23 वर्षीय रॉबिन वेस्टमन नावाच्या व्यक्तीने केलेल्या या हल्ल्यात एक रायफल, एक शॉटगन आणि एक पिस्तूल वापरण्यात आली. वेस्टमनने या शस्त्रांवर 'डोनाल्ड ट्रम्पला मारा' आणि 'भारतावर अणुबॉम्ब टाका' असे संदेश लिहिले होते. हल्ल्यानंतर वेस्टमनने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

गुन्हेगाराचा मानसिक प्रवास
न्यायालयाच्या नोंदीनुसार, वेस्टमनचे मूळ नाव रॉबर्ट होते. २०२० मध्ये त्याने लिंग बदलून रॉबिन वेस्टमन हे नाव धारण केले. एका यूट्यूब चॅनेलवर त्याने काही व्हिडिओ अपलोड केले होते, ज्यात शस्त्रे, दारूगोळा आणि गोळीबार करणारी मासिका दिसून आली. या मासिकांवर 'डोनाल्ड ट्रम्पला मारून टाका', 'इस्रायल कोसळला पाहिजे' आणि 'भारतावर अणुबॉम्ब टाका' असे अनेक प्रक्षोभक संदेश लिहिलेले होते. त्याच्या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या कुटुंबाला पत्र लिहून केलेल्या कृत्याबद्दल माफी मागितली होती. या व्हिडिओमध्ये त्याने काही डायऱ्याही दाखवल्या होत्या, ज्यामध्ये अनेक संदेश रशियन सिरिलिक भाषेत लिहिलेले होते. यावरून त्याचा मानसिक स्थिती आणि विचारधारा किती विकृत होती, याचा अंदाज येतो.
The Minneapolis Catholic school shooter was Robin Westman.
— Leftism (@LeftismForU) August 27, 2025
He was a biological male who identified as a transgender "woman."
Written on his guns and magazines were things like "kill Trump now," "6 million was not enough" (referring to the Holocaust), "for the children," "I'm… pic.twitter.com/KGEauspsTQ
अमेरिकेतील गोळीबाराची वाढती संख्या
ही घटना जानेवारीपासूनची अमेरिकेतील १४६ वी गोळीबाराची घटना आहे. अमेरिकेत बंदुकीचे कायदे शिथिल असल्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. अमेरिकन समाजात मानसिक आरोग्य समस्या, सामाजिक अलगाव, गुंडगिरी आणि तीव्र संताप यांसारखी कारणे अनेक हल्लेखोरांना हिंसाचाराकडे वळवतात. या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शोक व्यक्त करत देशभर अमेरिकन ध्वज अर्ध्यावर फडकवण्याचे आदेश दिले.
या घटनेतून एक गोष्ट समोर येते, की काही लोक कोणत्याही विशिष्ट देशाचा किंवा व्यक्तीचा द्वेष करतात, आणि त्यांच्या मानसिक आजारामुळे ते असा भयानक मार्ग स्वीकारतात. या घटनेत 'भारतावर अणुबॉम्ब टाका' असा संदेश लिहिल्याने नक्कीच भारताला एक धोका निर्माण झाला आहे.












Click it and Unblock the Notifications