'इराणने शांत राहावे नाहीतर विनाश! डोनाल्ड ट्रम्पंनी धमकावले! पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे वाचा

US Strikes In Iran : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला इशारा इराणचे सर्वोच्च नेते खोमनेई यांनी धुडकावल्यानंतर अमेरिकेने इराणवर एअर स्ट्राईक केला. यानंतर फोर्डो, नतान्झ आणि एस्फहानसह इराणमधील तीन अणुस्थळांवर हल्ला केला आहे. या हल्ल्याची माहिती खुद्द राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ट्वीट करुन जगाला दिली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत इराणला पुन्हा इशारा दिला आहे.

US Strikes In Iran Trump s big statement in PC

इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या युद्धात अमेरिका आता उघडपणे समोर आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की 'अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे अणुस्थळ पूर्णपणे नष्ट झाले आहेत. आता इराणने शांत राहावे अन्यथा त्याचे परिणाम योग्य होणार नाहीत.' ट्रम्प म्हणाले की 'अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणुस्थळांवर - फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानवर हवाई हल्ले यशस्वीरित्या केले आहेत.' पत्रकार परिषदेत त्यांनी आज जनतेला संबोधित केले. या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे जाणून घेऊया.

पत्रकार परिषदेत इराणबद्दल काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

  1. इराणच्या तीन ठिकाणांवर रात्री अमेरिकन सैनिकांनी जो हल्ला केला तो एका शब्दात सांगायचे म्हणजे सैन्यांचे शानदार यश असे मी म्हणेल.
  2. या हल्ल्यांचा उद्देश सांगायचा झाला तर इराणची अणूसंवर्धन क्षमता नष्ट करणे हे होय. जगातील पहिल्या क्रमाकांच्या दहशतवादाला पाठबळ देणाऱ्यांच्या अणु कार्यक्रमाला थांबवणे हेच आपले उद्देश आहे.
  3. इराणची अणू संवर्धन सेवा पुर्णपणे नष्ट झाली आहे. इराणने आता शांततेत घ्यावे, शांततेसाठी प्रयत्न करावेत.
  4. इराणवर हल्ला हे आमचे आणि आमच्या सैनिकांचे यश आहे . त्यामुळे आता इराणने शांतता बाळगायला हवी जर त्यांनी असे केले नाही तर भविष्यात विनाश होईल अर्थात आता जसे केले तसे मोठे हल्ले होतील..
  5. एकतर शांतता राहील किंवा विद्धवंस होईल. मागील आठ दिवसांत जे पाहिले त्यापेक्षा मोठा विद्धवंस होईल. अजूनही काही लक्ष्य आहेत जे हल्ल्यापासून वाचले आहेत.
  6. रात्री जे लक्ष्य केले गेले ते सर्वात कठीण होते ते कायदेशीर दृष्ट्याही कठीण ..पण शांतता जर लवकर स्थापित झाली नाही तर आम्ही अजून सुयोग्य नियोजनबद्ध आणि तीव्र हल्ले करु.
  7. रात्री जो एअरस्ट्राईक केला त्या बहादूर अमेरिकन सैनिकांचे मी अभिनंदन करतो.. त्यांच्या शौर्य आणि क्षमतांवर विश्वास आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+