Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

डोनाल्ड ट्रम्प यांचे हिंदू मतांवर लक्ष, दिवाळी शुभेच्छा आणि दिले 'हे' आश्वासन

US Presidential Election 2024 : रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प सध्या सर्व समाजाला आकर्षित करण्याचे काम करत आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला अवघे पाच दिवस शिल्लक राहिल्याने दोन्ही गटांकडून सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराचा निषेध केला आहे. शिवाय गुरुवारी त्यांनी सोशल मीडियावर हिंदूंना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.

ट्रम्प यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मिडिया प्लॅटफाँर्म एक्सवर हिंदूंना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांना म्हटले आहे की, बांगलादेशात जमाव हिंदूंवर हल्ले करत आहेत आणि लुटत आहेत. तेथे अराजकतेची स्थिती आहे. आपल्या कार्यकाळात असे कधीच घडले नसते. कमला आणि बायडेन यांनी अमेरिकेसह जगभरातील हिंदूंची उपेक्षा केली आहे.

Donald Trump

हिंदूंच्या रक्षाणाची ट्रम्प यांची ग्वाही

कट्टरपंथी डाव्यांच्या धर्मविरोधी अजेंड्यापासून हिंदूंचे संरक्षण करू, असे आश्वासन ट्रम्प यांनी दिले. त्यांनी पंतप्रधान मोदींना त्यांचे चांगले 'मित्र' म्हणून वर्णन केले आणि भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करु, असेही सांगितले. ट्रम्प म्हणाले की, आम्ही अमेरिकेला पुन्हा मजबूत करू आणि येथे शांतता प्रस्थापित करू.

बांगलादेशातील हिंसाचाराचा घेतला समाचार

आरक्षणविरोधी आंदोलनांमुळे बांगलादेशातील परिस्थिती अस्थिर झाली होती. बांगलादेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याकांवर, विशेषत: हिंदू समुदायाविरुद्ध हिंसाचार झाल्याच्या अनेक बातम्या आल्या. बंगाली वृत्तपत्र डेली स्टारच्या मते, बांगलादेश हिंसाचाराच्या मुद्द्यावर ट्रम्प यांनी विधान करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत ट्रम्प हिंदू मतदारांना आकर्षित करताना दिसत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+