अमेरिकेने 'या' देशाच्या राष्ट्राध्यक्षाला घातल्या हातकड्या! डोळ्यावर पट्टी बांधून नेले USमध्ये कारण?
Us operation absolute resolve venezuela president nicolas maduro captured trump : अमेरिकन लष्कराने अत्यंत गुप्तपणे राबवलेल्या 'ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझोल्व्ह' अंतर्गत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी पहाटे ४:२१ वाजता 'ट्रुथ सोशल'वर ही मोठी घोषणा केली. मादुरो यांना बेड्या ठोकून आणि डोळ्यावर पट्टी बांधलेल्या अवस्थेत अमेरिकन युद्धनौका 'यूएसएस इवो जिमा'वर नेल्याचा फोटोही ट्रम्प यांनी प्रसिद्ध केला आहे.

मध्यरात्रीचा थरार
ही मोहीम एखाद्या हॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नव्हती. गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयए (CIA) मादुरो यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होती. शुक्रवार रात्री १०:४६ राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या कारवाईला अंतिम मंजुरी दिली. त्यानंतर शनिवार पहाटे १:००: अमेरिकेच्या 'डेल्टा फोर्स'च्या एलिट कमांडोजनी कराकस येथील मादुरो यांच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या 'फोर्ट्रेस'वर छापा टाकला.
हवाई हल्ला, १५ हजार सैनिक, १५० विमाने..
कारवाईपूर्वी अमेरिकन विमानांनी कराकसच्या आसपासच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर क्षेपणास्त्र डागून ती निकामी केली. १५० हून अधिक विमाने आणि १५,००० सैनिक या मोहिमेत सहभागी होते.
पोलादी दरवाजे तोडून घरात शिरले कमांडो
ट्रम्प यांनी 'फॉक्स न्यूज'ला दिलेल्या माहितीनुसार, मादुरो यांचे घर एखाद्या किल्ल्यासारखे होते, जिथे पोलादी दरवाजे आणि अभेद्य सुरक्षा होती. मात्र, अमेरिकन सैनिकांनी काही सेकंदात हे अडथळे पार केले. मादुरो यांनी एका सुरक्षित खोलीत जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यापूर्वीच कमांडोजनी त्यांना घेरले. "त्यांना विचार करण्याचीही संधी मिळाली नाही," असे ट्रम्प यांनी नमूद केले.
मादुरो यांच्यावर अमेरिकेने कोणते आरोप लावले आहेत?
- अमेरिकेच्या न्याय विभागाने मादुरो यांच्यावर अनेक गंभीर आरोप ठेवले आहेत, ज्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली.
- मादुरो यांनी कोलंबियातील बंडखोर गटांसोबत मिळून अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोप आहे.
- व्हेनेझुएलाच्या तिजोरीतून अब्जावधी डॉलर्सची लूट करून ते पैसे परदेशात वळवल्याचा आरोप.
- आपल्या सत्तेचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबणे आणि लोकशाहीची हत्या करणे असे त्यांच्यावर आरोप आहेत.
जागतिक पडसाद आणि चीनचा धक्का
मादुरो यांच्या अटकेनंतर जगात खळबळ उडाली आहे. चीनने या घटनेवर 'गंभीर धक्का' बसल्याची प्रतिक्रिया दिली असून अमेरिकेच्या लष्करी कारवाईचा निषेध केला आहे. दुसरीकडे, ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचा कारभार आता अमेरिका पाहणार असल्याचे जाहीर केले असून कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांनाही इशारा दिला आहे.
मोहिमेचे वैशिष्ट्य
सहभागी कुमक : आर्मी डेल्टा फोर्स, एफबीआय एजंट्स.
लष्करी ताकद: १ विमानवाहू नौका, ११ युद्धनौका, आणि एफ-३५ सारखी अत्याधुनिक लढाऊ विमाने.
विशेष कारवाई का: मोहिमेत काही अमेरिकन सैनिक जखमी झाले असले, तरी कोणाचाही मृत्यू झालेला नाही.












Click it and Unblock the Notifications