Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अमेरिकेचे मोठे पाऊल! 50 टक्के टॅरीफची अधिसूचना जारी! भारताचे 'एवढे' प्रचंड नुकसान, ट्रम्पंचा इशारा

US issues tariff notification : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने आपले अडमुठे धोरण कायम ठेवत भारतावर पुन्हा एकदा नवीन अतिरिक्त 25 टक्के शुल्क (Tariff) लावले आहे. अमेरिकेने याबाबत औपचारिक अधिसूचना जारी केली असून, यापूर्वीच्या 25 टक्के शुल्कासह आता एकूण 50 टक्के शुल्क 28 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार आहे.

US issues tariff notification

शुल्कामागचे अमेरिकेचे कारण

अमेरिकेच्या कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन (CBP) विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकारी आदेश १14329 नुसार, भारताने रशियाकडून तेल खरेदी करून थेट रशियाला मदत केली आहे. अमेरिका मानते की, रशिया हा पैसा युक्रेनविरुद्धच्या युद्धावर खर्च करत आहे. त्यामुळे, या भूमिकेचा निषेध म्हणून अमेरिकेने भारतावर हे अतिरिक्त शुल्क लावले आहे.

Take a Poll

भारताला झळ बसणार..!

या शुल्कामुळे भारताला मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. जवळपास 87 अब्ज डॉलर्सच्या व्यापारावर याचा परिणाम होऊ शकतो. विशेषतः कपडे, दागिने, साबण आणि इतर उत्पादनांवर याचा मोठा परिणाम होईल, असे अमेरिकेने म्हटले आहे. हे नवे शुल्क 27 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्री 12 वाजल्यानंतर लागू होईल. या तारखेनंतर अमेरिकेत दाखल होणाऱ्या किंवा वेअरहाऊसमधून निघणाऱ्या भारतीय उत्पादनांवर हे अतिरिक्त शुल्क लागू होईल.

पंतप्रधान मोदी म्हणाले - झुकणार नाही

या वाढत्या आर्थिक दबावावर भारताची भूमिका स्पष्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर येथील एका सभेत आपले मत व्यक्त केले. "आम्ही अमेरिकेच्या आर्थिक दबावाची चिंता करत नाही. भारत आपल्या ताकदीवर कोणताही मार्ग काढेल. कोणताही दबाव आला तरी आम्ही तो सहन करण्याची तयारी ठेवतो. आम्ही आमची ताकद वाढवत आहोत, आत्मनिर्भर भारत अभियानातून आम्हाला हे बळ मिळत आहे," असे मोदी म्हणाले.

जिथे तेल स्वस्त, तिथूनच खरेदी! भारताकडून आधीच स्पष्ट

विनय कुमार यांनी अमेरिकेने लादलेल्या या शुल्कांना 'अयोग्य आणि अव्यवहारिक' म्हटले. ते म्हणाले की, भारत व्यापारी तत्त्वांवर आधारित निर्णय घेतो आणि सर्वात कमी खर्चिक पर्याय निवडतो. भारताचे धोरण स्पष्ट आहे; जिथे तेल स्वस्त मिळेल, तिथूनच ते खरेदी केले जाईल.

भारत दबावापुढे झुकणार नाही...

भारताने अमेरिकेला स्पष्टपणे सांगितले की, भारत आपल्या राष्ट्रीय हित आणि ऊर्जा गरजांसाठी कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही. भारताची ही भूमिका जागतिक तेल बाजाराला स्थिर ठेवण्यासाठीही मदत करत आहे. विनय कुमार म्हणाले की, अनेक युरोपियन देश आणि खुद्द अमेरिकाही रशियासोबत व्यापार करत आहेत. त्यामुळे भारताच्या व्यावसायिक निर्णयांवर अमेरिकेच्या शुल्काचा कोणताही परिणाम होणार नाही.

हेही वाचा : पंतप्रधान सोडा..आधी भारताच्या राजदुतांनीच ट्रम्प यांना ठणकावले! 4 मुद्यात जाणून घ्या, काय म्हणाले ते

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+