Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Us Elections 2024 : कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प ? अमेरिकेची लढत कोण जिंकणार?

Us Elections 2024 : अमेरिकेच्या निवडणुकीत कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जोरदार चुरस आहे. या दोन्ही उमेदवारांमध्ये नुकतंच राष्ट्राध्यक्षपदासाठीचं डिबेट म्हणजे वादविवाद आणि चर्चा झाली. यामध्ये कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांच्यावर मात केली, असं सगळ्यांचं निरीक्षण आहे. असं असलं तरी प्रत्यक्ष निवडणुकीत नेमकं कोण जिंकेल याबदद्ल आम्ही वाॅशिंग्टन डी. सी. मध्ये राहणारे पत्रकार रोहित कुलकर्णी यांची मुलाखत घेतली. रोहित कुलकर्णी यांनी व्हाॅइस आॅफ अमेरिका या चॅनलचे संपादक म्हणून काम पाहिलं आहे. सध्या ते अमेरिकेत मीडिया कन्सल्टंट म्हणून काम करतात.

अमेरिकेच्या या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डाॅनल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आहेत. कमला हॅरिस या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आहेत. अमेरिकेत येणारे बेकायदेशीर निर्वासित, रोजगार आणि महागाई तसंच महिलांना गर्भपाताचा अधिकार हे या निवडणुकीतले महत्त्वाचे मुद्दे आहेत.

Donald Trump

अमेरिकेत मेक्सिकोमधून येणारे निर्वासित फक्त याच देशातून येतात असं नाही. हे निर्वासित किंवा स्थलांतरित लोक मेक्सिकोच्या मार्गे येतात. भारतातूनही असे बेकायदेशीर स्थलांतरित अमेरिकेत जातात. हे नेमके कोणत्या राज्यांतून येतात याबद्दल रोहित कुलकर्णी यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर या निर्वासितांच्या लोंढ्यांना कमला हॅरिस जबाबदार आहेत, असा आरोप का होतो याचंही विश्लेषण त्यांनी केलं आहे.

निर्वासितांबदद्ल ट्रम्प यांची काय भूमिका आहे आणि कमला हॅरिस यांचं काय म्हणणं आहे हेही या मुलाखतीत ऐकायला मिळेल. हैतीमधून येणारे निर्वासित पाळीव प्राणी खातात, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. त्यात किती तथ्य आहे हेही तपासणं महत्त्वाचं आहे.
कमला हॅरिस या आफ्रिकन अमेरिकन आहेत. पण त्याचबरोबर त्यांचे वडील जमैकाचे आणि आई भारतातली आहे. कमला हॅरिस यांच्या भारतीय असण्यामुळे अमेरिकेतले भारतीय लोक त्यांना पाठिंबा देतायत का हाही प्रश्न आम्ही रोहित कुलकर्णी यांना विचारला.

रशिया - युक्रेन युद्ध, इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष आणि गाझामधला हिंसाचार या मुद्द्यांचा आणि अमेरिकन निवडणुकीचा थेट संबंध आहे. 'मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालो तर युक्रेनचं युद्ध थांबवेन', असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. कमला हॅरिस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष झाल्या तर गाझा मधला हिंसाचार थांबेल का ? हाही प्रश्न विचारला जातोय. या मुद्द्यांवर रोहित कुलकर्णी यांनी या मुलाखतीत सविस्तर भाष्य केलं आहे.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये जशी डिबेट होतात तशी भारतात व्हावी का ? याही प्रश्नांचं समर्पक उत्तर तुम्हाला या मुलाखतीत ऐकायला मिळेल. भारताच्या लोकसभा निवडणुका, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्याबद्दल अमेरिकेत काय चर्चा असते यावरही रोहित कुलकर्णी यांनी भाष्य केलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+