EVMच्या वापरातून मतदानात हेराफेरी; एलन मस्क यांचा दावा; म्हणाले- बॅलेट पेपरवर निवडणुका...

अमेरिकन उद्योगपती एलन मस्क यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तर ईव्हीएमचा वापर करुन मतदानात हेराफेरी करता येते, असा दावा त्यांनी केला. अमेरिकन न्यूज एजन्सी एबीसीच्या वृत्तानुसार, मस्क यांनी निवडणुका या बॅलेट पेपरद्वारे घेतल्या जाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. विशेष बाब म्हणजे अमेरिकेत निवडणूक अवघ्या 15 दिवसांवर असताना असा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.

एक्स सोशल मीडियाचे मालक तथा अमेरिकन उद्योगपती मस्क यांनी डोमिनियन कंपनीच्या मतदान यंत्रांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले. एबीसीच्या वृत्तात, म्हटले आहे की, फिलाडेल्फिया आणि ऍरिझोना व्यतिरिक्त या मशीन्स इतरत्र कुठेही वापरल्या जात नाहीत. या दोन्ही ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाला. हा एक विचित्र योगायोग आहे, असा दावा एलन मस्क यांनी केला आहे. तर संगणकीय प्रोग्राम हॅक करता येऊ शकतात, त्यामुळे ईव्हीएमवर जास्त विश्वास ठेवता येणार नाही.

Elon Musk on EVM

EVM बनवणाऱ्या कंपन्यांनी आरोप फेटाळला

दुसरीकडे, व्होटिंग मशीन बनवणारी कंपनी डोमिनियनने मस्क यांचा आरोप फेटाळला आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की डोमिनियन फिलाडेल्फिया राज्यात सेवा देत नाही. तसेच, आमची मतदान प्रणाली मतदाराला बॅलेट पेपरवर दिलेल्या मताची पुष्टी करण्यास मदत करते. याशिवाय, आम्ही अनेक वेळा मशिन व्होट आणि बॅलेट पेपर मतांची मोजणी एकत्र करून ऑडिट केले आहे. हे सिद्ध होते की आमचे मशीन व्यवस्थित काम करत आहे.

अमेरिकेत फक्त 15 दिवस उरले

अमेरिकेत 5 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आहेत. या निवडणुकांमध्ये एलन मस्क उघडपणे ट्रम्प यांच्या समर्थनार्थ प्रचार करत आहेत. मस्क यांनी सुमारे 630 कोटी रुपये निधीही दिला आहे. यासोबतच मस्क 2024 च्या निवडणुकीत सर्वाधिक निधी देणारे उद्योगपती बनले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+