Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ट्रम्पंकडून भारताची नस दाबण्याचा प्रयत्न! मोदी माझे मित्र पण.. PM मोदींचा उल्लेख करत दिला 'हा' इशारा

Trump warns india new tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर दबावाचे राजकारण सुरू केले आहे. "पंतप्रधान मोदींना माहित आहे की मी नाराज आहे," अशा स्पष्ट शब्दांत ट्रम्प यांनी रशियाकडून सुरू असलेल्या तेल आयातीवर आक्षेप घेतला आहे. ही आयात न थांबवल्यास भारतीय उत्पादनांवर 'झटपट' आयात शुल्क वाढवण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली असून, यामुळे भारतीय निर्यातदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Trump warns india new tariffs


"मोदी माझे मित्र, पण..." : ट्रम्प यांची थेट भूमिका

व्हेनेझुएलाचे नेते निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर ऊर्जा राजकारणावर भाष्य करताना ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख केला. ते म्हणाले, "पंतप्रधान मोदी हे एक चांगले माणूस आहेत, माझे मित्र आहेत, पण त्यांना माहित आहे की मी रशियाकडून तेल घेण्याच्या मुद्द्यावर आनंदी नाही. भारत रशियासोबत व्यापार करत आहे, पण आम्ही त्यांच्यावर खूप लवकर आणि वेगाने आयात शुल्क लावू शकतो." रशियाच्या युद्ध अर्थव्यवस्थेला खिळ घालण्यासाठी भारताने सहकार्य करावे, अशी वॉशिंग्टनची इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय निर्यातदारांवर टांगती तलवार

  • ऑगस्ट २०२५ मध्येच अमेरिकेने भारतीय वस्तूंवर ५०% आयात शुल्क लादले होते. आता पुन्हा शुल्क वाढवल्यास कापड, दागिने, शेती उत्पादने आणि आयटी सेवांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
  • ऑगस्ट २०२५ चा फटका: ५०% टॅरिफमुळे आधीच भारतीय निर्यातीवर दबाव आहे.
  • जर हे शुल्क आणखी वाढले, तर अमेरिकन बाजारपेठेत भारतीय वस्तू महाग होऊन त्यांची मागणी घटण्याची भीती आहे.

रशियाकडून तेल आयात भारतासाठी का महत्त्वाची?

युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून रशिया भारताचा सर्वात मोठा कच्चे तेल पुरवठादार बनला आहे. रशियाकडून सवलतीच्या दरात मिळणाऱ्या तेलामुळे भारतातील इंधनाचे दर नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली आहे. भारताने सातत्याने ही भूमिका मांडली आहे की, तेल खरेदी हा व्यावसायिक निर्णय आहे, राजकीय नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+