Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ट्रम्पांचा फ्रान्सला 'इशारा'; मॅक्रॉनांनी आमंत्रण नाकारताच 200% टॅरिफची घोषणा; ग्रीनलँडवरून आक्रमक..

Trump France tariff : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यातील राजनैतिक संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. ट्रम्प यांच्या महत्त्वाकांक्षी 'बोर्ड ऑफ पीस' मध्ये सामील होण्यास मॅक्रॉन यांनी नकार दिल्याने संतापलेल्या ट्रम्प यांनी आता फ्रान्सच्या प्रसिद्ध वाईन आणि शॅम्पेनवर 200 टक्के टॅरिफ लादण्याची धमकी दिली आहे. "मॅक्रॉन लवकरच पद सोडणार आहेत, त्यांना कोणालाही बोलावण्याची इच्छा नाही," अशा बोचऱ्या शब्दांत ट्रम्प यांनी फ्रान्सवर टीकास्त्र सोडले आहे.

Trump France tariff

काय आहे हे 'बोर्ड ऑफ पीस'?

गाझा पट्ट्यातील युद्ध संपल्यानंतर तिथे शांतता प्रस्थापित करणे, पुनर्बांधणी करणे आणि तात्पुरते पॅलेस्टिनी प्रशासन चालवणे या उद्देशाने डोनाल्ड ट्रम्प यांनी या मंडळाची स्थापना केली आहे. मानवतावादी मदतीचे व्यवस्थापन आणि संघर्षोत्तर प्रशासनावर देखरेख ठेवणे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनाही या मंडळात सामील होण्यासाठी निमंत्रण दिले आहे. मात्र, अद्याप कोणाकडूनही अधिकृत संमती मिळालेली नाही.

'मॅक्रॉन पायउतार होणार'; ट्रम्प यांची खोचक टीका

मॅक्रॉन यांनी या शांती मंडळात सहभागी होण्यास नकार दिल्यानंतर ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना आक्रमक पवित्रा घेतला. ट्रम्प म्हणाले, "कोणीही त्यांना (मॅक्रॉन) या मंडळात येऊ इच्छित नाही कारण ते लवकरच अध्यक्षपद सोडणार आहेत. जर मी त्यांच्या वाईनवर २००% टॅरिफ लावला, तर ते नक्कीच धावत येतील, पण आता त्यांना उपस्थित राहण्याची गरजच उरलेली नाही."

ग्रीनलँडचा मुद्दा: वादाची मुख्य ठिणगी

अमेरिका आणि युरोपीय देशांमधील वादाचे मूळ 'ग्रीनलँड' या बेटाच्या नियंत्रणात आहे. ट्रम्प यांना ग्रीनलँडवर अमेरिकेचे नियंत्रण हवे आहे, ज्याला फ्रान्ससह आठ युरोपीय देशांनी कडाडून विरोध केला आहे.

१०% आयात शुल्क : विरोधाचा बदला म्हणून ट्रम्प यांनी या आठ युरोपीय देशांतून येणाऱ्या वस्तूंवर १०% कर लावण्याची घोषणा केली आहे, जो पुढील महिन्यापासून लागू होईल.

खाजगी संदेशाचा गौप्यस्फोट : ट्रम्प यांनी मॅक्रॉन यांचा एक खाजगी संदेश शेअर केला, ज्यामध्ये मॅक्रॉन इराण आणि सीरियाच्या मुद्द्यावर ट्रम्प यांच्याशी सहमत आहेत, मात्र ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून ते ट्रम्प यांच्यावर प्रचंड नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जागतिक व्यापारावर होणारे परिणाम

जर ट्रम्प यांनी फ्रेंच वाईन आणि शॅम्पेनवर खरोखरच २००% टॅरिफ लावला, तर जागतिक मद्य व्यापार विस्कळीत होऊ शकतो. तसेच, अमेरिकेने युरोपीय देशांवर १०% कर लावल्यास युरोप आणि अमेरिका यांच्यात मोठे 'व्यापार युद्ध' सुरू होण्याची शक्यता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+