भारतावर का लावला टॅरिफ, ट्रम्प यांनी सत्य सांगूनचं टाकलं...
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठे विधान केले आहे. भारतावर लावलेल्या टॅरिफमुळेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भेटायला तयार झाल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे म्हटले आहे. १५ ऑगस्ट रोजी अलास्कामध्ये ट्रम्प आणि पुतिन यांची भेट होणार आहे. या बैठकीत रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा अपेक्षित आहे.

ट्रम्प यांचा मोठा दावा
डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतावर ५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावला आहे. या निर्णयामुळे भारताला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. यासंदर्भात एका मुलाखतीत बोलताना ट्रम्प म्हणाले, "जेव्हा आम्ही भारताला सांगितले की तुम्ही रशियाकडून तेल खरेदी केले तर आम्ही तुमच्यावर आयातशुल्क लावू, तेव्हा भारताने रशियाकडून तेल घेणे बंद केले. यामुळे रशियाने मला फोन करून भेटण्याची विनंती केली." ट्रम्प यांच्या या विधानामुळे भारताच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
रशियाला मोठा ग्राहक गमावण्याची भीती
ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, भारत हा रशियाकडून तेल खरेदी करणारा दुसरा सर्वात मोठा देश आहे. पहिला क्रमांक चीनचा आहे. "जेव्हा तुम्ही तुमचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक गमावण्याची शक्यता निर्माण होते, तेव्हा असे निर्णय घेतले जातात," असे म्हणत ट्रम्प यांनी रशियाला मोठा ग्राहक गमावण्याची भीती वाटत असल्याचे सूचित केले.
ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा
ट्रम्प यांच्या दाव्यानुसार भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले असले, तरी भारताने हे स्पष्टपणे नाकारले आहे. दरम्यान, अलास्का बैठकीआधी ट्रम्प यांनी पुतिन यांना एकप्रकारे इशारा दिला आहे. युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी या बैठकीत सहमती न झाल्यास पुतिन यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. या भेटीनंतर रशिया-युक्रेन युद्धाचे भवितव्य काय असेल, याकडे आता जगाचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications