हृदयद्रावक Video ! बोटीवर आग लागून 143 प्रवाशांचा मृत्यू, अनेकांचा झाला कोळसा; कित्येक बेपत्ता...
अफ्रिकन देश असणाऱ्या काँगोमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. लाकडी बोटीला आग लागून बोटीवर प्रवास करणारे १४३ प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक लोक बेपत्ता झाले तर काही जण गंभीर जखमी झाले. स्वयंपाक करताना पेटविलेली आग इंधनाच्या टाकीपर्यंत गेल्याने टाकीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

कसा झाला अपघात?
मंगळवारी वायव्य डीआरसीमधील काँगो नदीवर लाकडी बोटीतून शेकडो प्रवासी प्रवास करत होते. काँगो ही जगातील सर्वात खोल नदी समजली जाते. इक्वेट्यूर प्रांताची राजधानी असणाऱ्या म्बांडाकाजवळ या बोटीला आग लागली. स्वयंपाक करत असताना एका महिलेने शेगडी पेटवल्यानंतर त्या आगीचा भडका थेट इंधनाच्या टाकीजवळ गेला, असे सांगितले जात आहे.
🇨🇩🕊️❗️JUST IN: At least 148 people have died and hundreds remain missing after a motorized wooden boat, caught fire and capsized on the Congo River on Tuesday. Officials say the fire began when a woman was cooking on board.
— MoloOSINT🎖️ (@44Molo) April 19, 2025
🔹Many victims, including children, drowned after… pic.twitter.com/9CtOf6wT4h
किती झाले मृत्यू?
या अपघाताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. या बोटीत किती प्रवासी प्रवास करत होते, याचा आकडा अद्याप समजलेला नाही. तथापी आत्तापर्यंत १४३ जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यात अनेक महिला व लहान मुलांचा समावेश आहे. तर कित्येक प्रवासी बेपत्ता झाल्याचेही सांगितले जात आहे. काही जण आगीत भाजून गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
जीव धोक्यात घालून प्रवास
२३ लाख चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या विशाल मध्य आफ्रिकन देश डीआरसी म्हणजेच काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक येथे रस्त्यांचा आभाव आहे. रस्ते वाहतुकीच्या सुविधा नसल्यामुळे येथील लोक तलाव आणि नद्यांमधून प्रवास करतात. येथील काँगो नदी ही नाईल नदीनंतर आफ्रिकेतील दुसरी सर्वात लांब नदी आहे. येथील लोक काँगो नदी आणि तिच्या उपनद्यांमधून प्रवास करतात. येथे अनेकदा जहाजांचे अपघात होतात.
अनेकदा झालेत अपघात
प्रवाशांची योग्य यादी नसल्यामुळे अनेकदा अपघात झाल्यानंतर शोधकार्यात अडथळा येतो. ऑक्टोबर २०२३ मध्ये विषुववृत्तीय भागात काँगोमध्ये जाणारी एक बोट बुडाल्याने किमान ४७ लोकांचा मृत्यू झाला होता. स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पूर्व डीआरसीमधील किवू सरोवरात बोट उलटून २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. २०१९ मध्ये किवू सरोवरावर झालेल्या आणखी एका जहाज अपघातात जवळपास १०० लोकांचा मृत्यू झाला होता.












Click it and Unblock the Notifications