Sunita Williams Retirement : सुनीता विल्यम्स यांचा अंतराळ मोहिमेला रामराम! वाचा त्यांची लव्ह स्टोरी
Sunita williams nasa retirement love story husband : भारताचे नाव अंतराळात अजरामर करणाऱ्या नासाच्या स्टार अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी २७ वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर अंतराळ कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ अखेरीस त्यांची निवृत्ती लागू झाली आहे. सुनीता विल्यम्स केवळ त्यांच्या ऐतिहासिक मोहिमांसाठीच नाही, तर त्यांच्या साध्या आणि तितक्याच फिल्मी 'लव्ह स्टोरी'मुळेही चर्चेत आहेत.

प्रशिक्षणादरम्यान जडले प्रेम
सुनीता विल्यम्स यांची प्रेमकाहानी एखाद्या बॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नाही. त्यांची आणि त्यांचे पती मायकल जे. विल्यम्स यांची पहिली भेट १९९० मध्ये एका ट्रेनिंग सत्रादरम्यान झाली होती. सुनीता या अंतराळ क्षेत्रातील जटिलता समजून घेण्यात हुशार होत्या, तर मायकल हे अमेरिकेच्या फेडरल मार्शल सेवेत कार्यरत होते. दोन टोकाच्या कार्यक्षेत्रात असूनही त्यांच्यातील विचारांचे आणि स्वभावाचे सूर जुळले.
५ वर्षांचे डेटिंग आणि विवाह
एकमेकांना नीट समजून घेतल्यानंतर सुनीता आणि मायकल यांनी सलग ५ वर्षे एकमेकांना डेट केले. त्यानंतर १९९५ मध्ये त्यांनी विवाहगाठ बांधली. गेल्या ३० वर्षांपासून हे जोडपे एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. "मायकल यांचा संयम आणि समजूतदारपणा हीच माझी खरी ताकद आहे," असे सुनीता विल्यम्स अभिमानाने सांगतात.
धार्मिक विविधतेचा आदर
सुनीता विल्यम्स यांचे वडील दीपक पंड्या हे मूळचे गुजरातचे आहेत. सुनीता यांचा हिंदू धर्मावर गाढा विश्वास आहे. त्या अंतराळात जाताना सोबत 'भगवद्गीता' आणि 'गणपतीची मूर्ती' घेऊन गेल्या होत्या. विशेष म्हणजे, ख्रिश्चन धर्मीय असलेले मायकल हे सुनीता यांच्या श्रद्धांचा पूर्ण आदर करतात आणि त्यांच्या प्रत्येक यशात सहभागी होतात.
सुनीता विल्यम्स: थोडक्यात परिचय
- जन्म: १९ सप्टेंबर १९६५ (ओहायो, अमेरिका).
- शिक्षण: युएस नेव्ही आणि नासा.
- अनुभव: ३०० पेक्षा जास्त दिवस अंतराळात वास्तव्य आणि महिलांमध्ये सर्वाधिक 'स्पेसवॉक'चा विक्रम.
- कुटुंब: वडील डॉ. दीपक पंड्या (न्यूरोएनाटोमिस्ट), आई उर्सुला पंड्या, भाऊ जय थॉमस आणि बहीण दीना अन्नाद.












Click it and Unblock the Notifications