स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी देणार महाकुंभला भेट; गोत्र घेत हिंदू नावही केले धारण

प्रयागराज येथे सुरु होणाऱ्या महाकुंभमेळा २०२५ ला अनेक दिग्गज भेट देणार आहेत. अँपलचे सहसंस्थापक दिवंगत स्टीव्ह जाँब्ज यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल यासुद्धा कुंभमेळ्याला भेट देणार आहेत. विशेष म्हणजे त्या १५ दिवस या मेळ्यात सहभागी होणार असून त्यांनी त्यासाठी हिंदू नावही घेतले आहे.

Lauren Powell

कधी येणार लॉरेन पॉवेल?

लॉरेन पॉवेल या महाकुंभमेळ्यास १३ जानेवारीला येणार आहेत. निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद यांच्या शिबिरात त्या राहणार आहेत. त्या येथे २९ जानेवारीपर्यंत असतील. महाराजा डिलक्स काँटेज येथे त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. जगातील सर्वात प्रभावशाली व अब्जाधीश व्यक्ती म्हणून लॉरेन पॉवेल यांना अनेकदा सन्मान मिळाला आहे.

हिंदू नावही घेतले

लॉरेन पॉवेल यांचे गुरु स्वामी कैलाशानंद महाराज यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ॲप्पलचे सहसंस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांचा २०११ मध्ये दुर्धर आजाराने मृत्यू झाला होता. आता त्यांच्या पत्नी आपल्या गुरुला भेटण्यासाठी येथे येत आहेत. आम्ही त्यांना आमचे गोत्रही दिले आहे. आणि त्यांचे नाव कमला असे ठेवले आहे. त्या आमच्या मुलीप्रमाणे आहेत. त्या दुसऱ्यांदा भारताला भेट देत आहेत.

मिळाले कथेचे यजमानपद

लॉरेन पॉवेल भारतात सुमारे १५ दिवस थांबणार असून, १९ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या कैलाशानंद यांच्या कथेच्या त्या मुख्य यजमानही असणार आहेत. त्या सनातन धर्म सजण्याचा प्रयत्न करणार आहेत. स्टीव्ह जाँब्ज यांचाही भारतीय संस्कृतीवर प्रचंड विश्वास होता. भारतीय साधू संतांना ते मानत होते. १९७४ मध्ये स्टीव्ह जॉब्स नीम करोली बाबाच्या दरबारात आले होते. त्यावेळी ते कैंची धाम येथे उतरले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+