Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Statue of Liberty : ब्राझीलमध्ये तुफान ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' पत्त्यासारखी कोसळली! बघा VIDEO

Statue of Liberty Replica Collapses in Brazil : ब्राझीलमध्ये आलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. चक्रीवादळे, मुसळधार पाऊस आणि प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनी ब्राझीलच्या दक्षिण भागाला अक्षरशः वेठीस धरले आहे. या वादळाची तीव्रता इतकी होती की, रिओ ग्रांडे डो सूल राज्याच्या राजधानीत ४० मीटर (७९ फूट) उंच असलेली स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची भव्य प्रतिकृती अक्षरशः पत्त्यासारखी कोसळली आहे.

Statue of Liberty Replica Collapses in Brazil

तुफानाचा थरार आणि लिबर्टी कोसळली

रिओ ग्रांडे डो सूल राज्यातील गुईबा शहरात सोमवारी (१५ डिसेंबर २०२५) रोजी दुपारी हे मोठे तुफान धडकले. उष्ण आणि थंड वाऱ्यांच्या मिश्रणातून हे अति-तीव्र वादळ निर्माण झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. या शहरात ताशी १०० ते ११० किलोमीटर वेगाने वाऱ्यांचे झोत वाहत होते.

याच वाऱ्यांच्या तडाख्यामुळे शहरातील एका मेगास्टोअर बाहेर उभी असलेली ७९ फूट उंचीची स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची प्रतिकृती हळूहळू वाकत गेली आणि अखेरीस पार्किंगच्या रिकाम्या जागेत कोसळली.

मोठा धोका टळला..!

ही घटना घडत असताना परिसरात कोणीही नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. तसेच, स्टोअरच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने वाहने बाजूला केल्याने कोणतेही मालमत्तेचे मोठे नुकसान झाले नाही. २०२० मध्ये ११ मीटर उंच काँक्रीटच्या पायावर हे विलोभनीय शिल्प स्थापित करण्यात आले होते. विग्रह कोसळला असला तरी पाया मात्र शाबूत राहिला आहे.

राज्यात हाय अलर्ट जारी

पौर संरक्षण संस्थेनुसार, ताशी ९० ते ११० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहत आहेत. महानगरीय भागात हवामानाचा अत्यंत तीव्र इशारा जारी करण्यात आला आहे. वाऱ्यांमुळे होणाऱ्या अपघातांबाबत स्थानिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. टीओ ह्यूगो शहरात जोरदार पाऊस आणि गारपीट झाली, तर लाजेडो शहरात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे ऐतिहासिक महत्त्व

  • १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीस युरोपमधून आलेल्या लाखो स्थलांतरितांसाठी, ही मूर्ती अमेरिकेच्या भूमीवर दिसणारे पहिले दृश्य होते. त्यामुळे हे मूर्ती नव्या जीवनाच्या आणि स्वातंत्र्याच्या आशेचे प्रतीक बनले.
  • स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची संकल्पना आणि निर्मिती फ्रान्सने केली.
  • अमेरिकेतील लोकशाही आणि स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल फ्रान्सने अमेरिकेला मैत्रीचे प्रतीक म्हणून ही मूर्ती भेट दिली होती. अमेरिका आणि फ्रान्समधील मैत्री दृढ करणे हा त्यामागचा उद्देश होता.
  • १९२४ मध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला अमेरिकेचे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.
  • स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ही केवळ एक भव्य वास्तू नसून, ती फ्रान्स आणि अमेरिका यांच्यातील मैत्री, तसेच जगभरातील लोकांसाठी स्वातंत्र्य, लोकशाही आणि मानवी हक्कांचे एक शक्तिशाली प्रतीक आहे
  • प्रसिद्ध फ्रेंच इतिहासकार एडोअर्ड डे लाबोलाय यांनी १८६५ मध्ये ही संकल्पना मांडली.

डिझाईन आणि बांधकाम

फ्रेंच शिल्पकार फ्रेडरिक ऑगस्टे बार्थोल्डी यांनी या मूर्तीची रचना केली. त्यांनी रोमन देवी लिबर्टास (Libertas - स्वातंत्र्याची रोमन देवी) यांच्यापासून प्रेरणा घेतली.

मूर्तीच्या आतील पोकळ सांगाड्याची रचना सुप्रसिद्ध फ्रेंच अभियंता गुस्ताव्ह आयफेल यांनी केली, ज्यांनी आयफेल टॉवरचीही रचना केली. ही मूर्ती तांब्याच्या पत्र्यापासून बनवलेली आहे. तिच्या बाहेरील भागावर कालांतराने रासायनिक प्रक्रिया झाल्यामुळे आज तिचा रंग हिरवा दिसतो.

स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे महत्व

मशाल : ज्ञानाचे आणि प्रगतीचे प्रतीक.

टॅब्लेट (शिळा): यावर रोमन अंकांमध्ये 'JULY IV MDCCLXXVI' (४ जुलै १७७६) ही तारीख कोरलेली आहे, जी अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस दर्शवते.

तुटलेली साखळी: मूर्तीच्या पायाशी तुटलेली साखळी असून ती जुलूम आणि गुलामगिरीतून मिळालेल्या मुक्तीचे प्रतीक आहे.

(टीप ः जगात एकच मूळ स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे, जी न्यूयॉर्कमध्ये आहे; पण याच्या अनेक लहान-मोठ्या प्रतिकृती (replicas) जगभरात आहेत. यातील कोसळलेली प्रतिकृती ब्राझीलमधील आहे.)

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+