मोठी बातमी : 2 हाय-स्पीड ट्रेन आमनेसामने धडकल्या, 21 जण ठार! काळजाचा थरकाप उडवणारा अपघात

Spain high speed train accident : स्पेनमधील कोर्डोबा प्रांतात रविवारी (१८ जानेवारी २०२६) एक अंगावर शहारे आणणारी रेल्वे दुर्घटना घडली आहे. दोन हाय-स्पीड ट्रेनमध्ये झालेल्या भीषण धडकेत आतापर्यंत २१ प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. स्पेनच्या आधुनिक रेल्वे इतिहासातील ही सर्वात मोठी शोकांतिका मानली जात आहे.

Spain high speed train accident

नेमकी घटना काय?

वनइंडिया हिंदीने स्पॅनिश रेल्वे नेटवर्क 'ADIF' च्या माहितीनुसार या अपघाताचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, एडामुज स्थानकाजवळ संध्याकाळी ५:४० च्या सुमारास हा अपघात झाला. मालागा ते माद्रिदकडे जाणारी 'Iryo' या खासगी कंपनीची हाय-स्पीड ट्रेन अचानक रुळावरून घसरली आणि दुसऱ्या ट्रॅकवर आली. त्याच वेळी समोरून माद्रिद-हुएलवा मार्गावरून येणाऱ्या दुसऱ्या वेगवान ट्रेनची या घसरलेल्या डब्यांना जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही गाड्यांचे इंजिन आणि सुरुवातीचे डबे अक्षरशः चक्काचूर झाले.

युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी दाखल झाली. डबे एकमेकांवर चढल्यामुळे प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी गॅस कटर आणि अवजड यंत्रांचा वापर करावा लागला. जखमींना तातडीने कोर्डोबा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

रेल्वे सेवेवर मोठा परिणाम

या अपघातानंतर माद्रिद आणि अंडालुसिया प्रदेशादरम्यानची हाय-स्पीड रेल्वे सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. रेल्वे तज्ज्ञांकडून सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता की तांत्रिक बिघाड, याची उच्चस्तरीय चौकशी केली जात आहे. स्पेनचे राजा फेलिपे सहावे आणि राणी लेटिझिया यांनी या दुर्घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत पीडित कुटुंबांप्रती संवेदना प्रकट केल्या आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+