20 वर्षे 'झोपेत' राहिलेल्या 'स्लीपिंग प्रिन्स'चे निधन; वाचा-एका पित्याच्या प्रेमाची हृदयद्रावक कहाणी
Sleeping Prince Alwaleed Bin Khalid Passes Away : जगभरात 'स्लीपिंग प्रिन्स' म्हणून ओळखले जाणारे सौदी प्रिन्स अल वालीद बिन खालिद बिन तलाल अल सौद यांचे शनिवारी वयाच्या ३५ व्या वर्षी निधन झाले. सुमारे २० वर्षांपूर्वी एका कार अपघाताचा बळी ठरल्यापासून ते कोमात होते आणि म्हणूनच त्यांना 'स्लीपिंग प्रिन्स' असे म्हटले जात असे. त्यांच्या निधनाने एका अद्भुत आणि हृदयद्रावक कथेचा शेवट झाला आहे, जी एका पित्याच्या अढळ प्रेमाची कहाणी आहे.

१५ व्या वर्षी जीवनात आलं भयंकर वादळ
'आज तक'च्या वृत्तानुसार, १९९० मध्ये जन्मलेले प्रिन्स अल वालीद हे सौदी राजघराण्याचे प्रमुख आणि अब्जाधीश प्रिन्स अल वालीद बिन तलाल यांचे पुतणे, प्रिन्स खालिद बिन तलाल अल सौद यांचे ज्येष्ठ पुत्र होते.
२००५ मध्ये, जेव्हा अल वालीद अवघे १५ वर्षांचे होते, तेव्हा ते लंडनमध्ये लष्करी कॅडेट म्हणून शिक्षण घेत होते. त्याच दरम्यान एका भयानक कार अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांना ब्रेन हॅमरेज झाला.
या दुर्घटनेने त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले आणि ते कोमात गेले. या अपघातानंतर जगभरातील उत्तम आरोग्य सुविधा आणि अमेरिकन तसेच स्पॅनिश डॉक्टरांच्या मदतीनंतरही, प्रिन्स अल वालीद कधीही पूर्ण शुद्धीवर येऊ शकले नाहीत आणि कोमात असतानाच तब्बल वीस वर्षानंतर त्यांचे शनिवारी निधन झाले.
वडिलांच्या अढळ प्रेमाची अतूट कहाणी
गेल्या २० वर्षांत, प्रिन्स अल वालीद बहुतेक वेळा कोमात राहिले. कधीकधी त्यांच्या शरीरात थोडी हालचाल दिसायची, ज्यामुळे त्यांच्या वडिलांना, प्रिन्स खालिद बिन तलाल यांना आशेचा एक छोटासा किरण दिसायचा. त्यांनी कधीही आशा सोडली नाही आणि आपल्या मुलाला व्हेंटिलेटरवरून काढण्याच्या सूचना त्यांनी जाहीरपणे नाकारल्या. देवावरील त्यांच्या अढळ श्रद्धेमुळे ते आपल्या मुलावर उपचार करत राहिले. जगभरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी जरी हार मानली होती, तरी या २० वर्षांत त्यांच्या वडिलांचा विश्वास कधीच डगमगलेला नव्हता, हेच त्यांच्या प्रेमाचे प्रतिक होते.
दरवर्षी साजरा करत असत वाढदिवस
प्रिन्स खालिद बिन तलाल एकदा म्हणाले होते, "जर देवाला त्या अपघातात त्याचा मृत्यू व्हायचा असेल, तर तो खूप आधी गेला असता. पण त्यांनी आजपर्यंत त्याचा आत्मा रोखून धरला आहे. तो त्यांना नक्कीच बरे करेल. एप्रिलमध्ये, राजकुमार अल वालीद यांच्या शेवटच्या वाढदिवस साजरा झाला. यावेळी जगभरातील लोकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या.
वडिलांची भावनिक पोस्ट
प्रिन्स अल वालीद यांचे जीवन आणि त्यांचा दीर्घ संघर्ष केवळ वैद्यकीय आव्हाने दर्शवत नाही, तर मानवी भावना आणि कुटुंबाप्रती असलेल्या समर्पणाची एक अनोखी कहाणी देखील सांगतो. राजकुमार अल वालीदचे वडील खालिद बिन तलाल यांनी एका भावनिक पोस्टमध्ये त्यांच्या मुलाच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. कुराणातील एका श्लोकाचा उल्लेख करून त्यांनी लिहिले, "अल्लाहच्या इच्छेवर आणि आदेशावर विश्वास ठेवणाऱ्या अंतःकरणाने आणि खोल दुःखाने, आम्ही आमचा प्रिय मुलगा प्रिन्स अल वालीद, अल्लाह त्याच्यावर दया करो, ज्याचे आज निधन झाले, त्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त करतो.












Click it and Unblock the Notifications