पृथ्वीचा नाश होणार का? प्रलयाचे संकेत देणाऱ्या डुम्सडे माशांचा तडफडून मृत्यू; VIDEO व्हायरल
Signs of the Flood, Will the Earth be destroyed : अनेकदा पृथ्वीच्या विनाशाची चर्चा होत असते, तर कधी कोणता बाबा पृथ्वीचा नाश होण्याचे भाकित करतो. 2020 मध्ये जगबुडी होणार अशी निव्वळ थापा मारणारी भाकितंही व्यक्त केली गेली. त्यानंतर अशीच चर्चा आता होत आहे, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात नेटीझन्सनी पृथ्वीच्या विनाशाबद्दल चर्चा करत चिंताही व्यक्त केली आहे.
तुम्हाला सांगायचे झाल्यास असे काही भूचर प्राणी, जलचर प्राणी असतात की, ते भूकंप, प्रलयाचे किंवा पृथ्वीवर काहीतरी अघटीत घडण्याचे संकेत देत असतात अशातच दुर्मिळ 'डूम्सडे फिश' मासा जो खोल पाण्यातच राहतो, त्याने असेच काहीसे संकेत दिले आहेत. अटलांटिक महासागरातील कॅनरी बेटांना लागून असलेल्या किनाऱ्यावर डूम्सडे मासा वाहून गेला.

Tv9 भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे, त्यानुसार, खोल पाण्यात राहणारा हा मासा स्पेनच्या लास पालमास शहरातील नदीच्या किनाऱ्यावर आला आणि वेदनेने मरण पावला अशी माहिती पुढे आली आहे. एक धारणा अशी आहे की, हा मासा जर दिसला तर काहीतरी मोठा अनुचित अघटीत घडते, आणि हा मासा तेव्हापासून परिसरात किनाऱ्यावर दिसला, यामुळे तेथील लोक आता चिंता व्यक्त करत आहे.
काय आहे या माशाबद्दल धारणा
डूम्सडे मासा हा ओअरफिश आहे. तो समुद्राच्या बाहेर सहसा दिसत नाही, क्वचितच दिसतो, या माशाला समुद्राच्या खोलीत राहायला आवडते. हा मासा जिथे दिसला तिथे नक्कीच काहीतरी वाईट घडते अशी एक धारणा आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर याची चर्चा होत आहे. जपानी लोककथेनुसार, खोल समुद्रात राहणारा हा मासा भूकंप किंवा त्सुनामी दर्शवू शकतो. जपानी लोक ओअरफिशला आपत्तीचे लक्षण मानतात. 2011 मध्ये फुकुशिमा येथे झालेल्या शक्तिशाली भूकंपाच्या आधी समुद्रकिनारी ओअरफिश दिसल्याचे सांगितले जाते. गेल्या वर्षी लॉस एंजेलिसमध्ये भूकंप झाला तेव्हा अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्येही ऑरफिश दिसले होते.
हा व्हिडिओ झाला व्हायरल
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक ओअरफिश समुद्राच्या किनाऱ्यावर तरंगताना दिसत आहे. इतर माशांच्या तुलनेत ओअरफिशचा आकार पूर्णपणे वेगळा असतो. डोक्यावर एक लहान लाल हाड आहे, तर शरीर चमकदार चांदीचे असते. हा मासा तब्बल 36 फूटापर्यंत लांब असू शकते. या वेळी एक व्यक्ती मासे परत पाण्यात सोडण्याचा प्रयत्न करतो असे या व्हिडिओत दिसते पण तो प्रयत्न अयशस्वी झालेला आहे. हा व्हिडिओ @insidehistory इंस्टाग्राम हँडलने शेअर केला आहे. त्यावर लोक आता कमेंट करत आहेत.
-
VerSe Innovation चा नफा आणि AI-आधारित वाढीकडे कल, भविष्यात IPO चे नियोजन -
VerSe Innovation चा नफा आणि AI-आधारित वाढीकडे कल, भविष्यात IPO चे नियोजन -
मोठी बातमी ! अनेक वर्षांचा दुष्काळ संपणार! इराणकडून भारताला सर्वात मोठी ऑफर -
ट्रम्प यांच्या एका 'रीपोस्ट'ने जगात खळबळ; अमेरिका-इराणमधील हाडवैर आता पाकिस्तान संपवणार? -
आदित्य ठाकरे फिरत नाहीत अन् प्रियंका चतुर्वेदींचा उपयोग काय?" ठाकरे गटाच्या बैठकीत खासदारांचा संताप








Click it and Unblock the Notifications