बांगलादेशात पुन्हा मोठा हिंसाचार; शेख मुजीबुर रहमान यांचे घर पुन्हा जाळले, नेमकं झालंय काय?

बांगलादेशमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अवामी लीगने उद्या म्हणजेच ६ फेब्रुवारीला देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केली होती. मात्र आता एक दिवस आधीच बांग्लादेश अशांत झाले आहे. राजधानी ढाकासह बांगलादेशातील अनेक शहरांत हिंसाचार उसळल्याची माहिती मिळत आहे.

Violence in Bangladesh

नेमके काय झाले?

बांगलादेशातील अनेक शहरांमध्ये बुधवारी रात्री उशिरा पुन्हा हिंसाचार उसळला. बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या ढाका येथील धनमोंडी-३२ येथील निवासस्थानी निदर्शकांनी हल्ला केला आणि तोडफोड केली. सोशल मीडियावर 'बुलडोझर रॅली'ची घोषणा झाल्यानंतर ही हिंसाचार घडला.

सुरक्षा दलासमोर हिंसाचार

काही मिडियाच्या म्हणण्यांनुसार हा शेख मुजीबुर रहमान यांच्या निवासस्थानी हल्ला झाला, तेव्हा सुरक्षा दलही तेथे उपस्थित होते. सुरक्षादलाच्या जवानांनी गर्दीला तिथून निघून जाण्यास पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. काही दंगलखोर तर निवासस्थाने आणि संग्रहालयांमध्येही घुसले. बाल्कनीवर चढून तोडफोड केली. घरालाही आग लावण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बांग्लादेश पुन्हा अशांत

उद्या होणाऱ्या देशबंद आंदोलनापूर्वीच बांग्लादेश पुन्हा अशांत झाले आहे. यापूर्वीही अनेकदा अशा घटना घडल्या होत्या. तेव्हाही मोठी जिवीत व वित्तहानी झाली होती. आज बुधवारी रात्री पुन्हा हिंसाचार उसळला. जाळपोळ सुरु झाली. बांगलादेशचे पोलिस या सर्व घटनेवर काय पावले उचलतात हे पहावे लागेल. मात्र ही दंगल पोलिसांच्या हाताबाहेर गेल्याचे कही मिडिया हाऊसचे म्हणणे आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+